अक्की दा जवाब नही; केनेडियन असूनही भारतीयांना आपलासा वाटणारा आहे हा खिलाडी..!

अनेकजण आपली काहीतरी खास ओळख प्रस्थापित करून त्यावर बिजनेस मोड्यूल डेव्हलप करतात. त्यांचे हे यश अनेकांना दिवास्वप्न वाटत असते. मात्र, ते आपल्या भन्नाट स्टाईलने यशाची शिखरे चढतात आणि चढण्याची ऊर्मीही ठेवतात. आज अशाच एका केनेडियन नागरिकाचा वाढदिवस आहे. लोक त्याला भलेही भारतीय समजत असतील. त्याला डोक्यावर घेऊन मिरवत असतील किंवा तो एक सच्चा राष्ट्रभक्त आहे म्हणून गोडवे गात असतील. मात्र, त्याचे वास्तव वेगळे असले तरीही ते त्याच्या कर्तृत्वाच्या आड येत नाही. कारण, तो पडद्यावरचा ‘देशभक्त’ बनलाय. असे असल्यावर मग इतर मुडे गैरलागू ठरतात की. अशा बॉलिवूड अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. त्याचं नाव आहे राजीव कुमार भाटिया उर्फ अक्षयकुमार. आज अक्षयकुमार ५३ वर्षाचा झाला..!

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

अक्षयकुमारची ‘खतरों के खिलाडी’ अशी ओळख लोकांमध्ये आहे. त्यामागे कारण पण तसेच आहे. अक्षयकुमारच्या ८ चित्रपटात खिलाडी नाव आले आहे. अक्षयकुमार हा अभिनेता कराटेचा ब्लॅकबेल्ट मिळवलेला खेळाडूसुध्दा आहे. त्याचे चाहते त्याला अक्की म्हणतात. चाहत्यांच्या अक्कीचा जन्म हा अमृतसर येथे झाला. त्याने बॉलिवूडमध्ये येण्याच्या अगोदर थायलंडमध्ये शिक्षणसुध्दा घेतलेले आहे. शिक्षण घेत असताना त्याने एक कुक म्हणून पण काम केलेलं आहे. यावरून सोशल मीडियावर आणि लोकांच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या अफवा, चर्चा होत असतात. कारण, बॉलीवूड अभिनेते व अभिनेत्री यांच्या गॉसिपमध्येच त्यांचे खरे यश दडलेले असते. 

अक्षयकुमार ने २००१ साली ट्विंकल खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. या बाबतीत अक्षयकुमार एक किस्सा सांगतात. ज्यावेळी अक्षयला माहीत झाले की राजेश खन्ना हे “जय शिव शंकर” नावाचा चित्रपट तयार करत आहेत. त्यांना एका तरुण कलाकाराची गरज आहे. त्यावेळी अक्की राजेश खन्ना यांच्या ऑफिसला गेला. दोन-तीन तास वाट पाहिली. मात्र, राजेश खन्ना त्यांना भेटले नाहीत. मग अक्षय कंटाळून निघून गेला. तो म्हणतो की, मला कधी स्वप्नात पण वाटले नव्हते की मी त्यांच्या मुलीशी लग्न करू शकेल. अशी ही खास आठवण अक्षयकुमार सांगतो. 

सुरुवातीच्या काळात त्याने अँक्शन मूव्ही केल्या. मात्र, सध्या अक्षयकुमारचे चित्रपट पाहिले तर सामाजिक संदेश देणारे आहेत. त्याने केलेल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. त्याने देशभक्ती जागृत होईल असे बरेचसे चित्रपट केले. मात्र, या बाबतीत राज ठाकरे यांनी मागील काही काळापूर्वी एक विधान केले होते त्याची देशात वादळी चर्चा झाली होती. “स्वतः अक्षयकुमार कोण आहे? अक्षयकुमार हा काय भारतीय नागरिक नाही; तो कॅनडाचा नागरिक आहे”, असा टोला त्यांनी लावला होता. यावरून चर्चा झाली होती पण असो..!

त्याचा अभिनय टा चांगला आहे ना.. आणि चित्रपटाचा आशय.. भले त्यात सरकारचे उदात्तीकरण व भाटगिरीचा मसाला आसो.. अभिनय आवडतोय तर मग त्या लाडक्या अक्कीला शुभेच्छा नकोय का द्यायला..!

लेखक : गणेश शिंदे (सरकार)

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here