धक्कादायक : अप्रशिक्षित डॉक्टरांमुळे एकाचा १०८ अँब्युलन्समध्येच मृत्यू?; पहा कशी घडली ‘ही’ दुर्दैवी घटना

सरकारी सेवेच्या गलथानपणाचा कारभाराचा फटका सध्या हजारो रुग्णांना बसत आहे. तसाच आणखी एका जीवघेणा प्रकार घडल्याने महाराष्ट्र राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सगळे काही असूनही अप्रशिक्षित डॉक्टरांमुळे एकाचा १०८ अँब्युलन्समध्येच मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना अनेकांना चटका लावून गेली आहे.

https://www.facebook.com/photo/?fbid=3259859077433085&set=a.251981214887568

याबाबत पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी कर्जत (जि. रायगड) इथील पत्रकार संजय मोहिते यांची एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, संतोष पवार म्हणजे शासकीय अनास्थेने घेतलेला आणखी एका पत्रकाराचा बळी आहे. “त्या अर्ध्या” तासात काय घडले हे सांगताना त्यांनी लिहिले आहे की, खरतर 108  या अँब्युलन्स आणि त्यामधील अप्रक्षिक्षित स्टाफमुळे संतोष पवार यांना आपला जीव गमवावा लागला. सकाळी त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अड्मिट केल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल 54 % दाखवत होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आले. पण, त्याचवेळी डॉक्टर यांनी त्यांना या रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने तुम्हाला पुढे न्यावे लागेल असे सांगितले.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

त्यांनी पुढे लिहिले आहे की, पण आपल्या कर्जतमधे कारडीयाक अम्बुलँस नसल्याने त्यांना 108  मधून पुढे D. Y. Patil रुग्णालयात हलवण्याचे ठरले. यासाठी माजी आमदार सुरेश लाड, सुनील गोगटे, विकास मिरगनै, दर्वेष पालकर, रोशन दगडे आणि त्यांचा मुलगा मल्हार पवार हे प्रयत्न करत होते. अखेर 108 अँब्युलन्समधून ऑक्सिजन लावून पवार साहेबाना पुढे नेण्यासाठी अँब्युलन्स निघाली. पण भीलवलेच्या आसपास त्यांचा आधीचा लावलेला ऑक्सिजन सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर त्या अँब्युलन्समधील महिला डॉक्टरना लावता आला नाही. त्यामुळे तिने ड्राइवरला तो सिलेंडर रुग्णाला लावण्यास सांगितले. पण तो सिलेंडर लावत असताना त्याचा प्रेशर जास्त झाल्याने त्या सिलेंडरचा स्पोट झाला. त्यामुळे पुढे चौक प्राथमिक आरोग्य केंद्रापर्येंत संतोष पवार यांना दहा-पंधरा मिनिटे ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. 108 मधील सदोष यंत्रणा तसेच यामधील अप्रशिक्षित स्टाफ आणि कर्जतमध्ये व्हेंटीलेटर उपलब्ध नसणे यामुळे एका चांगल्या पत्रकाराचा बळी गेला आहे.

हे सर्व वाचताना कोणालाही संताप अनावर होईल. कारण, सगळे काही असतानाही जर एखाद्या रुग्णाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू होत असेल तर आपण सरकारी यंत्रणा किंवा डॉक्टर यांच्याकडे देवदूत म्हणून पाहायचे तरी कसे, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here