रोहित पवारांचा सवाल ; ‘ते’ पैसे कुठं मुरले? ‘कुणाची’ पातळी उंचावली?

अहमदनगर :

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीस सरकारने 9 हजार 634 कोटी रुपये खर्च केले होते. ही योजना लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रचंड फायदेशीर ठरेल, असेही भाजप नेते म्हणत. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारला फटकारले आहे. 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करून काहीही फरक पडला नसल्याचे कॅगने म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपवर सडकून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘तब्बल ९६३३ कोटी खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली’ असा सवाल युवा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी ₹ खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे.

पवारांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. किरण शिंदे यांनी म्हटले आहे की, काय बोलतायत दादा? ग्रामीण भागात फिरून पहा की रवळगव, घुमरी ,बेलगाव या गावांना या योजनेचा किती फायदा झालं आहे हे पण आपल्याला समजेल आज संपूर्ण गाव हे पाण्याखाली येऊन बागायत झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी मुरल गेलं आहे.

संपादन : स्वप्नील पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here