‘त्यांचा’ शिवसेनेला टोला; दाऊदच्या फोटोला काळे फासून…

मुंबई :

कोरोनासह राज्यात राजकारणही जोरात सुरु आहे. या दरम्यान अनेक वादविवाद समोर येत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना पदाधिकारी हे एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या फोटोला चपलांचा प्रसाद देत निषेध व्यक्त केला होता. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक निवासस्थान मातोश्रीला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

भातखळकर म्हणाले की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता.

या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या ईतरही महत्वाच्या नेत्यांना धमकीचे संदेश मिळाले होते. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. निखील जाधव यांनी म्हटले आहे की, मोदींना धमकी आली होती तेव्हा कोणाच्या तोंडाला काळे फासून व चपला मारून भाजप वाल्यांनी ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम साजरा केला होता??

सीमा प्रभात यांनी म्हटले आहे की, भाजपा असा आनंद मसूद अजहरला पाकिस्तानात त्याच्या घरापर्यंत सोडून साजरा करते. पुढे त्यांनी भाजपला दुतोंडी म्हणत टोलाही लगावला आहे.

एकूणच या ट्वीटनंतर भातखळकर आणि भाजप यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली नकारात्मकता समोर आलेली आहे. भारतीय विद्यार्थी युवक सेनेनं म्हटलं आहे की, तुमच्या आमदारकीला आपण स्वत: बाॅम्ब लावून घेतलाय. पुढल्या वेळेस आपण आमदार बनणार नाही एवढे नक्की.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here