सुरतच्या कापड व्यवसायालाही बसला मोठा फटका; पहा नेमके काय कारण आहे ते

गुजरातचे सुरत शहर म्हणजे कापड व्यावसायिकांचे आगार नव्हे राजधानी. याच व्यवसायाला लॉकडाऊन आणि नंतर आता तर कामगारांच्या अभावाचा मोठा फटका बसला आहे. टाळेबंदी लागू झाल्यावर करोनाचा संकटात घर जवळ केलेल्या कामगारांनी अजूनही कामावर येण्याची तसदी न घेतल्याचा हा मोठा फटका येथील व्यापारी सहन करीत आहेत.

कोविड १९ आजारामुळे मार्च आणि एप्रिल २०२० या कालावधीत लाखो मजुरांनी सुरत शहराला सोडून गाव गाठले. त्यामुळे त्यांचा रोजगार तर गेला आहेच वरून संबंधित कंपनी मालकांची परिस्थितीही वाईट झालेली आहे. कारण, खूप माल पडून राहिल्याने त्यांनाही खेळते भांडवल उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. अशावेळी आता टाळेबंदी उठली आहे. मात्र, वाहतूक सेवा सुरळीत न झाल्याने आणि कधीही बंद होण्याच्या अफवांचे पिक जोमात असल्याने मजूर अजूनही सुरत शहरात येऊ शकलेले नाहीत. त्याचा मोठा फटका या उद्योगास बसला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

पांडेसरा बुनकर कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेडचे अध्यक्ष आशीष गुजराती यांनी इकॉनॉमिक टाईम्स दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ओरिसा राज्यातील खूप मजूर सुरतेत कामाला आहेत. ते सध्या घरी गेले आहेत. त्यांना येण्यासाठी खास रेल्वे सोडण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटना तेथील मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्क करीत आहेत. गुजरात इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशन (GIDC) यांचे सचिव मयूर गोलवाला यांनी सांगितले की, सुरतेत किमान ६ लाख मजूर आहेत. त्यापैकी एकट्या ओरिसा राज्यातील मजूर किमान ५० टक्के आहेत. त्यांना आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मजूर आल्यावरच येथील कपडा बाजार पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सुरू होईल अशी शक्यता आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here