वाह..वा.. कोथिंबीरीचा झाला भन्नाट झटका; एकखट्टया मिळाले १२.५१ लाख, शेतकरी मालामाल..!

शेतकऱ्यांना कधी लॉटरी लागेल आणि त्याच्या कष्टाचे खरे चीज होईल याचा काहीही नेम नाही. असाच अपवादात्मक प्रकार घडला की आपण सगळे त्याला यशकथा म्हणून वाचतो आणि चर्चा करतो. कारण, शेतीमधील यशाचे गणित हे दर्जेदार उत्पादनावर नाही, तर त्याला मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून आहे. असाच प्रकार सिन्नर तालुक्यातील (जि. नाशिक) येथील नांदूर शिंगोटे गावाच्या विनायक हेमाडे यांच्या बाबतीत घडली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

हेमाडे यांच्या फ़क़्त चार एकर कोथींबीर पिकाची विक्री थेट १२.५१ लाख रुपयांना झालिया आहे. त्यांना एकाचवेळी तेव्हढी कॅश रक्कम डोक्यावर घेऊन जातानाचा हा फोटो सध्या सोशल मिडीयामध्ये ट्रेंडला आहे. अनेकांनी त्यानिमित्ताने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कौतुक करण्याची संधी साधली आहे. होय, हेमाडे यांच्याबाबत घडलेली ही घटना निश्चितच कौतुकास्पद आहे. हेमाडे यांनी ४ एकर जमिनीत ४५ किलो धने पेरले होते. त्याची काढणी करताना बाजारात कोथिंबीर जुड्यांना चांगला भाव आल्याने त्यांना ही लॉटरी लागली आहे.

धने पेरून ४१ दिवसांनी काढणी करताना बाजारात चांगला भाव मिळत असल्याने व्यापारी शिवाजी दराडे यांची ही चार एकरमधील लुसलुशीत कोथींबीर १२ लाख ५१ हजार रुपयांना मागितली. अशा पद्धतीने एकाच पिकाने हेमाडे यांना झटक्यात लखोपती करून टाकले आहे.

संपादन : गणेश शिंदे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here