भाजप प्रवक्त्यांनी संजय राउतांना लगावला ‘हा’ टोला; खाली आल्यात ‘अशाही’ प्रतिक्रिया

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्यामधील वाद आणखी पेटत आहे. या वादाला भाजपने आपलेसे करून घेत राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव आखला आहे. परिणामी करोना, आरोग्य, बेरोजगारी आणि इतर सामाजिक प्रश्न अपोआप मागे पडून निरर्थक मुद्यावर राजकारण जोमात आहे. त्यालाच हवा देण्यासाठी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी त्यांच्या स्टाईलने राउतांना टोला लगावला आहे.

त्यांनी भल्या पहाटे उठून ट्विटरवर पोस्ट केली आहे की, ‘चुक संजय राऊत यांची नाही. जशी ते औषधे डॉक्टर कडून न घेता कंपाऊंडर कडुन घेतात तसेच त्यांनी शिक्षण पण शिक्षकांकडून न घेता शाळेतल्या चपराश्याकडून घेतलं आहे.’ पुढे नॉटी असा शब्दही वाघ यांनी जोडून टाकला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

त्यावर तेजस पाटणकर यांनी खोचक प्रश्न करीत प्रतिक्रिया दिली आहे की, असं असेल तर मोरेंद्रजींनी कोणाकडून शिक्षण घेतलं पाकिस्तान कडून का , नाही संपूर्ण देश विकायला काढला आहे म्हणून विचारलं. तर, अनिकेत मोरे यांनी म्हटले आहे की, त्यांनी शिक्षण कोणाकडून का घेतलं असेना, पण एका माठ, आणि सतत अभ्यास करणाऱ्या मंद मुलाला कायमचं घरी बसवलं.

राज पाटील यांनी लिहिले आहे की, असे बोलून bjp कंपाऊडर चा आणि शिपाई वर्गाचा अपमान करत आहे मेहनती लोक असतात हे तुमच्या सारखे देश विकणारे नाहीत. तर, आशिष यादव यांनी नेमका राजकीय धागा पकडून वाघ यांना खोचकपणे आठवण करून दिली आहे की, तरी सुध्दा ते खासदार आहेत आणि तुम्ही?

संपादन : संचिता कदम

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here