ब्रेकिंग : Samsung घेऊन येत आहे पारदर्शक स्मार्टफोन; नेमके काय करणार कंपनी ते पहा

सध्या क्लासिकल स्मार्टफोन वापरण्याची अनेकांना सवय लागली आहे. नव्या तंत्रज्ञानाचे आणि आकर्षक दिसणारे आणि एकदम धा-सू फिचर असणारे मोबाइल वापरायला बहुतेकांना आवडते. ग्राहकांची आवड आणि त्यांच्या खिशातील पैशांना मोकळी वाट करून द्यायला आता सॅमसंग कंपनी थेट पारदर्शक स्मार्टफोन घेऊन येणार आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

LetsGoDigital यांनी याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात काही खूप माहिती दिली आहे असे नाही. मात्र, त्यांनी कंपनीने यूनाइटेड स्टेट्स पेटेंट ऐंड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) यांच्याकडे पेटेंट फाइल केल्याची माहिती यामध्ये दिली आहे. कंपनीने अजूनही याची अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. तसेच माहितीही प्रसिद्ध केलेली नाही. मात्र, एकूणच जर Samsung ने असे काही उत्पादन आणण्यात जर यश मिळवले तर बाजारात मोठी क्रांती होईल हे निश्चित आहेच की.

मात्र, याची नेमकी किती दिवस, महिने की वर्षे वाट पाहायला लागणार याबाबत अजूनही काहीच समजलेले नाही. फ्यूचरिस्टिक ट्रांसपेरेंट डिस्प्ले असलेला असा फोन बाजारात आणल्यास कंपनीला पुन्हा एकदा मोठा बुस्टर दोड मिळेल हे निश्चित.

संपादन : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here