ब्रेकिंग : ‘रेजांग ला’ बनले नवीन केंद्रबिंदू; पहा तिकडे चीन्यांनी नेमके काय केलेय ते

भारत-चीन सीमा विवाद आणखी जोर पकडू लागला आहे. भारताने डिजिटल क्षेत्रातील अनेक चीनी कंपन्यांना हादरा देऊन आर्थिक नाकेबंदी केल्यावरही मुजोर चीनी जागेवर आलेले नाहीत. उलट त्या महाभागांनी आता पुन्हा एकदा जास्त कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रेजांग ला जवळील एक टेकडी हाच मुख्य केंद्रबिंदू बनली आहे.

चीनने भारतीय सैन्य त्यांच्या ताब्यातील एका टेकडीवर चढून शह देत असल्याचा आरोप केला आहे. तर, भारताने सीमेवर अनेक वर्षांनी चीनी सैन्याने गोळीबार केल्याचे म्हटले आहे. चीन्यांनीही असाच दावा करून भारत आगळीक करीत असल्याचा कांगावा केला आहे. एकूणच सध्या दोन्ही बाजूने वातावरण तापलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाह देण्यासाठी चीन असे करीत असल्याचे वृत्त नवभारत टाईम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने दिले आहे.

त्यांनी बातमीत म्हटले आहे की, एक कर्तव्यकठोर आणि सक्षम नेता म्हणून मोदींची ओळख आहे. त्यालाच शाह देण्यासाठी चीनी कुरापती काढीत आहे. मात्र, त्यांना त्यात अजिबात यश येण्याची चिन्हे नाहीत. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा देश आणि सैन्य सोडून एखाद्या पक्षाला फायदा होणाऱ्या बातम्या येण्यास सुरुवात झालेली आहे. याचे नेमके काय कारण असावे, हे समजलेले नाही. मात्र, आता भारताने हे प्रकरण तातडीने मिटवून सीमेवर शांतता निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

चीनी कुरापातींना भारतीय सैन्य पुरून उरले आहे. सध्याही रेजांग ला येथील टेकडीवर भारताचा ताबा आहे. तिथे चीनी सैन्य चढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तीन दिवस प्रयत्न करूनही त्यांना अपयश आल्याचे नवभारत टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here