खुशखबर : म्हणून PUBG भारतात पुन्हा अवतीर्ण होणार; वाचा कोणत्या कारणाने पुन्हा हा गेम खेळता येणार ते

पब्जी (PUBG) नावाची ऑनलाईन गेम बंद झाल्याने कोट्यवधी खेळय्यांचा डीसमूड झाला आहे. भारत सरकारने चीनच्या सुमारे २२५ मोबाइल अॅप्लिकेशनवर बंदी घालताना पब्जीचाही खात्मा करून टाकला होता. मात्र, हा गेम पुन्हा जिवंत होऊन नव्या लाईफलाईनसह भारतात अवतीर्ण होणार आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

ही खुशखबर येण्याचे कारण काही भारत सरकार आपल्या निर्णयाला माघारी घेणार आहे असे नाही. तर, मोबाइलमध्ये खेळता येणारे हे अॅप्लिकेशन मूळ कंपनी भारतात पुन्हा आणण्याची चिन्हे आहेत. हे मुळचे चीनी कंपनीचे प्रोडक्ट नाही. ते आहे मूळ दक्षिण कोरिया देशाचे. त्याच्या मोबाइल व्हर्जनला चालवण्याचे हक्क चीनी कंपनी Tencent Games यांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना हे मोबाईल अॅप्लिकेशन चीनी वाटते. मात्र, आता त्याच मुळच्या कंपनीतर्फे हे भारतात अवतीर्ण होईल.

या गेमचा मूळ मालक दक्षिण कोरियाची कंपनी आहे. आता ती कंपनी चीनच्या कंपनीला मोबाइलवर अॅप्लिकेशन देणारी फ्रांचैझी काढून घेणार आहे. तीच कोरियाई कंपनी भारतात आता ही गेम पुन्हा आणणार असल्याची बातमी येत आहे. असे झाल्यास भारतीयांना पुन्हा या ‘जीवघेण्या’ आणि व्यसन जडवणाऱ्या गेम खेळता येणार आहेत.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here