लडाखमधील भागात आणि अरुणाचलप्रदेश राज्याच्या सीमेवरील इलाख्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. याच शांततेचा भंग करून कुरापतखोर चीन मुजोरी दाखवीत आहे. अशावेळी भारत शांत असून चीनशी वाटाघाटी करतानाच खमकी भूमिका घेतली जात आहे. तर, चीनने आता भारतीय सैन्य चीनच्या इलाख्यात जाऊन गोळीबार करीत असल्याचा कांगावा केला आहे.
ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.
चीनी सैन्याला भारतीय सैन्याने हिसका दाखवल्याच्या बातम्या येत असतानाच पुन्हा एकदा लडाखमधील सीमावर्ती भागात सोमवारी रात्री एका डोंगरावर अशी घटना घडल्याचे चीनचे म्हणणे आहे. यापूर्वीच्या घटनेत कोणतीही हाणी न झाल्याचा दावा करणाऱ्या चीनने सोमवारी रात्री भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. ग्लोबल टाईम्स नावाच्या त्यांच्या मुखपत्राने हा दावा केला आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्या हवाल्याने त्यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, चीनी लष्कराने आवाहन करताना म्हटलेय की, ज्या कोणी रात्री फायरिंग केली होती. त्या सैनिकास अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. दोन्ही देशांच्या सीमेवर असे शांतता धोक्यात आणणारे कृत्य कोणीही करू नये. चीन देशाच्या सार्वभौमतेला धोका होईल असे कृत्य अजिबात सहन केले जाणार नाही.
पैगोंग झील याच्या दक्षिण भागात असे घडल्याचे चीनी लष्कराने म्हटलेले आहे. भारतीय सैन्य किंवा सरकारने यावर अजूनही कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रशियात चीनी शिष्टमंडळाशी यावर चर्चा करून शांतता ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पुन्हा अशी बातमी आल्याने तणावात भर पडली आहे.
संपादन : सचिन पाटील