सर्वाभौमिक मानवाधिकार परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी ठाकर, तर महिला अध्यक्षपदी सुवर्णा कदम

ठाणे :

सर्वाभौमिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी वैभव परेश ठाकर आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुवर्णा कदम यांची निवड करण्यात आलेली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तरुण बकोलीया यांनी त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.

नियुक्ती पत्र देताना सुमन मौर्या, राष्ट्रीय सचिव मनीष नेरुरकर, हेमराज डिगवाल यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर ठाकर म्हणाले की, सध्या अवघे जग करोनाचा संकटाशी लढत आहे. अशावेळी माझी निवड ही करोनाशी लढणाऱ्या सर्व योद्ध्यांना समर्पित करीत आहे. सध्याच्या काळात आपण सर्वांनी एकमेकांची काळजी घेऊन लढण्याची गरज आहे. ही एकट्यादुकट्याची लढाई नाही. आपण सगळे मिळून यावर नक्कीच विजय मिळवू.

तर, सुवर्णा कदम यांनी म्हटले की, देशाच्या सर्वाभौमातेला आणि अखंडतेला महत्व देऊन आम्ही काम करणार आहोत. सर्वांच्या उन्नतीसाठी आमची परिषद काम करीत आहे. परिषदेची ध्येय्य धोरणे पुढे नेण्यासह आणि मानवतावादी विचार पुढे नेण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here