होय, टेक्नोलॉजीची कमालच ती; फ़क़्त २४ तासात स्वप्नातील घर प्रिंटेल सत्यात, वाचा महत्वाची बातमी

तंत्राज्ञानाची कमाल आणि होऊ द्या जोरदार धमाल, अशीच नवी व्याख्या तयार करणारा प्रकार आता अमेरिकेत एका कंपनीने सत्यात उतरवला आहे. आज रात्री एखादे टुमदार आणि गोड अशा फार्महाउसचे स्वप्न तुम्ही पाहिले. ते एखाद्याला सांगितले. त्यात योग्य त्या सूचना केल्या आणि पुढच्या फ़क़्त २४ तासात असे घर आपल्याला जर वास्तवात पाहायला मिळाले आणि त्यात झोपता, राहता आणि मनाजोगते कार्य करता आले तर..? मग, काय आनंदी आनंद गडे ना..?

अमेरिकेतील एका कंपनीने स्वप्न वाटणारी ही कल्पना सत्यात आणली आहे. आतातरी मोठ्या घरांसाठी नाही. मात्र, छोटेखानी घराचे स्वप्न यातून अवघ्या २४ तासात सत्यात अवतीर्ण होऊ शकणार आहे. तेही बांधकाम करून, वेल्डिंग करून किंवा प्रीफॅब्रिकेटेड शीट एकमेकांना जोडून नाही. तर, थ्रीडी तंत्रज्ञानाच्या प्रिंटरने ही कमाल केली जाणार आहे. आपल्या शुध्द मराठीत आपण त्याला प्रिंटेल होम असेही म्हणू शकतो की..!

3D प्रिंटिंग टेक्नॉलजी वापरून फ्यूचरिस्टिक हॉलिडे होम्स बगिचात किंवा तुमच्या शेतात लगोलग बसवून देण्याची किमया करणारी कंपनी ऑकलंड येथील आहे. तिचे नाव आहे Mighty Buildings. २४ तासात ३५० स्केअर फुटांचे स्वप्नघर बांधून देण्यात ही कंपनी यशस्वी झालेली आहे. 3D प्रिंटींग टेक्नोलॉजी वापरून या घराचा ढाचा तयार केला जातो. काही गोष्टी नंतर जोडल्या जातात आणि मग मालकाला पाहिजे त्या ठिकाणी हे घर हलवले जाते. त्यांचे हे एका देवासात बनलेले घर सध्या १ लाख डॉलर म्हणजे 73 लाख रुपयांना मिळत आहे. भविष्यात मात्र याच्या किमती आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी कंपनी संशोधन करीत आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here