ह.भ.प. लीलाबाई कोरडे यांचे निधन

अहमदनगर :

वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या मिरी (ता. पाथर्डी) येथील ह.भ.प. लीलाबाई कोरडे (वय ७२ वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी (दि. १४ सप्टेंबर २०२०) रोजी त्यांचा दशक्रीयाविधी होणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि सोसायटीचे चेअरमन विजय कोरडे यांच्या त्या मातोश्री होत्या. दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वडील नसतानाही त्यांनी मोठ्या जिद्दीने मुलांचे शिक्षण आणि वारकरी संप्रदायाचे काम केल्याच्या आठवणी विजय कोरडे यांनी सांगितल्या.

सोमवारी सकाळी ८ वाजता मातोश्री फार्म येथे त्यांचा दशक्रीयाविधी होणार आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here