लडाखमधील परिस्थिती गंभीरच; परराष्ट्रमंत्र्यांनी दिली कबुली, पहा काय म्हटलेय त्यांनी

सीमेवरील उलटसुलट बातम्या येत असतानाच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे म्हटले आहे. लडाखमधील पेगोंग झील भागातील काही टेकड्यांवर भारताने आपला दावा आणखी पक्का केला आहे. चीनच्या मुजोरी व कुरापतखोर धोरणाने हा तणाव वाढत आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

रशियामध्ये सध्या आठ देशांच्या शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन अर्थात एससीओची बैठक चालू आहे. यापूर्वीच तिते सर्व देशांमधील संरक्षणमंत्री एकमेकांना भेटले होते. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही चीनी शिष्टमंडळाशी सीमेवरील तणावाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सोमवारी रात्री भारतीय सैन्याने चीनी भागात शिरण्याचा प्रयत्न करून बेछूट गोळीबार केल्याचा आरोप चीनी सैन्याने केला आहे. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

त्यातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे रशियाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांनी तिकडे जातानाच भारत-चीन सीमेवर आलबेल नसल्याचे मान्य केले आहे. रशियात ते चीनी शिष्टमंडळाशी पुन्हा एकदा या मुद्यावर बैठक करण्याची शक्यता आहे. गुरुवारी याबाबतची बैठक होण्याची शक्यता आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here