9 हजार 634 कोटी रुपये पाण्यात; ‘तिथे’ झाली निकृष्ट कामे, पहा कॅगने काय म्हटलेय ‘जलयुक्त शिवार’बाबत

जलयुक्त शिवार अभियान म्हणजे ग्रामीण भागाच्या सर्व समस्यांवरील उत्तर असल्याचे चित्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात रंगवले गेले होते. मात्र, ते चित्र आभासी आणि फसवे होते यावर आता कॅगने शिक्कामोर्तब करून टाकले आहे. यावरील खर्चातून विशेष काहीही सध्या झाले नसल्याचे कॅगच्या अहवालात म्हटलेले आहे.

दिसली मोकळी जागा की करा खोदकाम. खोदकाम कशासाठी तर पाणी अडवण्यासाठी. मुद्दा कितीही रास्त असला तरीही जलसंधारण विषयाचे शास्त्र यामध्ये न पाळताच राज्यभरात खोदण्याचा अट्टाहास करण्यात आला होता. जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनीही वेळोवेळी याकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे अवघ्या महाराष्ट्राने आणि येथील माध्यमांनी दुर्लक्ष केले. अखेरीस या योजनेवर पाच वर्षांमध्ये तब्बल 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्यातून कितपत जलसंधारण झाले हे फ़क़्त कागदोपत्रीच दिसले. प्रत्यक्षात गावांचा दुष्काळ काही पूर्ण हटला नाही.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

कॅगच्या अहवालात यावरच प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीस सरकारने 9 हजार 634 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, एवढा पैसा खर्च करूनही फरक पडला नसल्याचे कॅगने म्हटले आहे. इतका खर्च करून नेमका काय फायदा झाला तेच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कॅगने यावर प्रश्न उपस्थित करणारा रिपोर्ट दिला आहे.

अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर आणि इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये झालेली या अभियानाची कामे दर्जाहीन आहेत असेही त्यात म्हटले आहे. एकूणच यामुळे या कामाच्या झालेल्या खर्चावर प्रश्न उपस्थित झालेला आहे. पाण्याची उपलब्धता नसतानाही बहुसंख्य गावे जलपरिपूर्ण असल्याचे जाहीर करून टाकल्याचा मुद्दाही कॅगने पकडला आहे. एकूणच माध्यमांना हाताशी धरून फडणवीस सरकारने मोठा निधी पाण्यात घातल्याचे या अहवालामुळे स्पष्ट झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here