शेअर बाजारातील दिग्गज आणि कन्झुमर सेक्टरमधील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या आयटीसी कंपनीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असलेला वाटा काही प्रमाणात का होईना कमी करायचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
सध्या या कंपनीकडे स्वतःच्या मालकीचे ५० हॉटेल्स आहेत. त्यापैकी १० कमी करून ही संख्या ४० वर आणण्याची तयारी कंपनीने केली आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जास्त पैसे अडकून पडतात आणि मग इतर सेक्टरमध्ये पैशांची चांचन जाणवत असल्याने कंपनीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
चेअरमन आणि एमडी संजीव पुरी यांनीच ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंपनीला आता न्यू नॉर्मल यावरून नेक्सट नॉर्मल लेव्हलला आणावे लागणार आहे. त्यामुळेच कंपनी लाइफस्टाइल रिटेल बिजनसचा टक्का कमी करीत आहेत. एग्जीक्यूटिव डायरेक्टर आणि हॉस्पिटैलिटी बिजनसचे इंचार्ज नकुल आनंद म्हणाले की, सध्या कंपनीच्या सर्व हॉटेलमध्ये १० हजार रूम आहेत. त्यातील ५,३०० मॅनेज कॅटेगरीचे आहे. आता हॉटेल कमी करतानाच रूमची संख्या १४ हजार आणि मॅनेज कॅटेगरीची संख्या ८,६०० केली जाणार आहे.
संपादन : सचिन पाटील