‘त्या’ पाचजणांचे चीन्यांनी केले अपहरण; अजूनही काहीच खबर नाही..!

शनिवारी (दि. ५ सप्टेंबर २०२०) जंगलात शिकारीसाठी गेलेल्या पाच तरुणांचे अपहरण करण्यात आले होते. त्या तरुणांची अजूनही काहीच खबर नसल्याची माहिती अरुणाचल प्रदेश पोलिसांनी दिली आहे. त्यांनी यावर चौकशी चालू असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनीही ट्विटरवर याबाबतची पोस्ट शेअर करून त्या पाच तरुणांना सोडवून आणण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगताना चीनकडून काहीच उत्तर न आल्याचेही त्यामध्ये लिहिले होते. एकूणच लडाखमधील भागात तणाव असतानाच अरुणाचल प्रदेश भरतील चीनी सीमेवरील तणाव या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शिकारीला गेलेल्या तरुणांना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्याने पकडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

तरुणांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, शुक्रवारी एकूण सात तरुण शिकारीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे जंगलात गेले होते. त्यापैकी दोघेजण कसेबसे पळून आले. मात्र, पाचही तरुणांना चीनी सैन्याने अपहरण करून नेले आहे. त्यांना सोडवून आणण्यासाठी पोलीस व सैन्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here