साक्षरता म्हणजे लिहिता-वाचता येणे नव्हे; तर त्याच्याही पुढचा सामाजिक विचार आहे हा

आज जगातील साक्षरता दिन आहे. साक्षरता म्हणजे लिहिणे, वाचणे किंवा पदवी मिळवणे इतकेच नाही तर, साक्षरता म्हणजे नेमके काय हे एकदा आपण समजून घेतले पाहिजे. लिहिता, वाचता येणारी माणसं पण कधीकधी निरक्षरासारखे वागतात. याचा पण आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने अभ्यास केला पाहिजे आणि सर्व बाबतीत आपण साक्षर झाले पाहिजे. नाहीतर कितीही टक्केवारी वाढून साक्षरांचे प्रमाण वाढले तरी सामाजिक साक्षरता दिन राहील की.

आज ८ सप्टेंबर या दिवसाला युनेस्कोने शिक्षणाचे व साक्षरतेचे महत्व लक्षात आणून देणारा दिवस बनवून टाकले आहे. आजच्या दिवशी साक्षरता दिन साजरा करण्याचा निर्णय हा ७ नोव्हेंबर १९६५ रोजी घेतला गेला. युनेस्कोमध्ये हा त्यावेळी साजरा करण्यात आला.  मात्र ८ सप्टेंबर  १९६६ पासून जगभरात साजरा केला जाऊ लागला. 

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

शासनाने साक्षरता वाढावी म्हणून मध्यान्ह भोजन, सर्व शिक्षा अभियान, प्रौढ शिक्षण, राजीव गांधी साक्षरता मिशन अशा उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम आजतागायत केलं आहे आणि करत आहेत. फक्त साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे, चार-दोन पदव्या असणे म्हणजे नाही. तर साक्षरता म्हणजे लोकांनां अधिकारांची, हक्कांची जाणीव होणे म्हणजे होय.

मुख्य म्हणजे कर्तव्यांची जाणीव म्हणजेही साक्षरता होय. तसेच महिला आणि पुरुषांच्यामधील समानता म्हणजे खऱ्या अर्थाने साक्षरता होय. नागरिक साक्षर झाले पाहिजेत. त्याना लिहिता व वाचता येण्याच्या बरोबरच त्यांना त्यांच्या हक्काची, कर्तव्यांची, तसेच देशातील मूल्यांची जाणीव असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. 

मतदानाच्या प्रक्रियेमध्ये लोकांनी सहभागी झाले पाहिजे. मात्र, याचे प्रमाण पाहायला गेलं तर शहरात फार कमी असते. मतदानाची टक्केवारी खेड्यांत चांगली टक्केवारी असते. मग खरे साक्षर कोणाला म्हणायचे हा पण या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो. लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव असली पाहिजे. आपण सर्वांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झाले पाहिजे तरच आपणाला साक्षर आहोत असा सांगण्याचा नैतिक अधिकार आहे.. नाहीतर… काय म्हणायचे ते तुमचे तुम्हीच ठरावा की..

लेखक : गणेश शिंदे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here