धक्कादायक : होय, ते आरोग्यासाठी खूपच घातक; केंद्राने दिली सुप्रीम कोर्टामध्ये कबुली..!

कारोना विषाणू आल्यावर नेमके काय करायचे याचीच माहिती नसल्याने कोणत्याही अशास्त्रीय आणि बोगस गोष्टींना महत्व आले. प्रशासनातील धुरिणांना यातले गमभन कळत नसल्याने अनेक चुकीचे निर्णय देशात घेण्यात आले. त्याचे दुष्परिणाम आता अवघा देश भोगत आहे. त्यातलाच एक विषारी निर्णय होता तो म्हणजे विषाणू मारण्याची गुहा.

या गुहेतून जाताना मानवास संसर्गमुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर रासायनिक कीटकनाशक किंवा थेट सॅनिटायझर फवारले जात होते. त्यामुळे होणारे दुष्परिणाम तज्ञांनी वेळीच लक्षात आणूनही दिले. तरीही अनेक सरकारी विभागातील बाबूंनी यावर लाखो रुपये खर्च करून उखळ पांढरे करून घेतले. त्यामुळेच सध्या सुप्रीम कोर्टामध्ये या विषाणू मारण्याची गुहा (Disinfectant Tunnels) या मुद्यावर सुनावणी सुरू आहे. तिथे केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनीही असे करणे आरोग्यास घटक असल्याची कबुली दिली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करणाराच हा प्रकार असल्याचे केंद्राच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात म्हटलेले आहे. याची सुनावणी जस्टिस अशोक भूषण, जस्टिस आर. सुभाष रेड्डी आणि जस्टिस एमआर शाह यांच्यासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशी कोणतीही शिफारस केलेली नाही. एकूणच आपल्या देशात कशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेउन अधिकारी आणि प्रशासन सामान्य जनतेच्या पैशांचा अपव्यय करीत आहे आणि त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्याचाच हा एक गंभीर नमुना आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here