‘तो’ लाडका आवाज आज ८७ वर्षांचा झाला की; आज आहे आशाताईंचा वाढदिवस

ज्या गायिकेच गाणं ऐकलं नाही, गाणं गुणगुणलं नाही असा माणूस महाराष्ट्रात दुर्बीण लावून पण सापडणार नाही. आवाजाची जादूई सफर घडवून आणणाऱ्या आशा भोसले यांचा आज वाढदिवस !

रुपेरी वाळूत माडाच्याबनात ये ना  ।
रुपेरी वाळूत माडाच्याबनात ये ना ।।
बनात ये ना ।जवळ घे ना ।।

हे गाणे एखादा प्रियकर एकटा असताना गुणगुनला नाही असे झाले नाही. सर्वांना प्रेमाची चाहूल लावणारे. जवळीक वाढवणारे आणि अतोनात प्रेम करावं अशी प्रेरणा आशा भोसले यांच्या आवाजात गाणे ऐकले की प्रत्येकाला मिळावी असले. असे खूप सारे भन्नाट गाणे आशा भोसले यांनी संगीत सृष्टीला दिले आहेत. 

आज त्या ८७ वर्षाच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली झाला. दीनानाथ मंगेशकर यांच्या सारख्या शास्त्रीय संगीतकाराच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांनी गायनाला सुरुवात आपल्या मोठ्या बहीण लता मंगेशकर यांच्या सोबत केली. त्यांचा हा प्रवास हा जो सुरू झाला तो वैश्विक पातळीवर एखादं काम करावं इतका जबरदस्त ठरला. त्यांनी तब्बल २० भाषांमध्ये १२ हजार पेक्षा जास्त गाणे गायली आहेत. याच बरोबर त्यांनी तब्बल १०० चित्रपटांना आवाज दिला आहे.

तसेच आशा भोसले यांनी “माई चित्रपटात” अभिनय सुध्दा केला होता. त्यांच्या अभिनयाचे त्या काळी कौतुक झाले होते.  त्यांच्या पार्श्वसंगीत साठी कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार ने त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार हा २००० साली दिला. आणि २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार ने सन्मानित केले गेले. 

अशा भोसले यांना १८ वेळा फिल्म फेअर साठी नामांकित केलं गेलं होते. ७ वेळा त्यांना फिल्म फेअर मिळाला. एक वेळ तर त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला आणि सांगितले की प्रतिभावंत लोकांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मी घेणार नाही. अशा मोठ्या मनाच्या कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक : गणेश शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here