ब्रेकिंग : ते पाचहीजण चीनी सैन्याच्या ताब्यात; भारतात आणण्यासाठी प्रयत्न : रिजीजू

रविवारपासून गायब असलेल्या पाच भारतीय तरुणांना ताब्यात घेतल्याचे अखेर चीनने काबुल केले आहे. ते तरुण चीनमध्ये सैन्याच्या ताब्यात असल्याची कबुली चीनने दिली आहे.

शिकारीला गेलेल्या त्या पाच तरुणांचे अपहरण चीनी सैन्याने केले होते. त्यांच्यामधील आणखी दोघेजण मात्र पळून येण्यात यशस्वी झाले होते. स्थानिकांनी आणि पत्रकारांनी याचे ट्विट करून मंत्री किरण रिजीजू आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानुसार चीनशी हॉटलाईन संपर्क झाल्यावर ते तरुण तिकडे असल्याची कबुली चीनने दिली. त्यांना पाठीमागे पुन्हा आपल्या देशात आणण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे रिजीजू यांनी आश्वासन दिले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here