अॅग्रोटेक कंपन्यांना मिळालाय $ 53.2 कोटीचा बुस्टर डोस; पहा नेमकी कुठे झालीय इन्व्हेस्टमेंट ते

शेतीमधील टेक्नोलॉजी आधारित व्यवसायांमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणि दिग्गज व्यावसायिकांना रस आहे. त्यासाठी ते उत्तमोत्तम प्लॅटफॉर्म शोधून त्यामध्ये गुंतवणूक करीत असतात. भारतातही मागील काही वर्षांमध्ये एकूण सुमारे ५३.२ कोटी डॉलर इतकी गुंतवणूक आलेली आहे.

EY नावाच्या बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या माध्यम समूहाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, देशात स्टार्टअप इकोफ्रेंडली वातावरण आहे. शेतीमध्ये मोठ्या संधी असल्याने त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन अनेक तरुण नवे अवकाश निर्माण करीत आहेत. भविष्यात मात्र गुंतवणूक वाढतानाच या कंपन्या एकमेकांमध्ये विलीनीकरण होण्याचीही प्रक्रिया होऊ शकते. २०२५ पर्यंत अॅग्रोटेकचे अवकाश किमान २४ अरब डॉलर इतक्या बाजार मूल्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

सध्याचे मार्केट लक्षात घेता सेक्टरनिहाय विचार केल्यास सप्लाई चेन, तंत्रज्ञान आणि आउटपुट मार्केट लिंकेज याचे मूल्य १२ अरब डॉलर, वित्तीय सेवा किमान ४.१ अरब डॉलर, कृषि व्यवसाय आणि व्यवस्थापन ३.४ अरब डॉलर, गुणवत्ता व्यवस्थापन आणि ट्रैसेबिलिटी किमान ३ अरब डॉलर इतके मोठे हे मार्केट आहे. भारतात यामध्ये मोठ्या संधी आहेत. सध्या अशा पद्धतीने समन्वयाचे हे मार्केट फ़क़्त १ टक्के आहे. भविष्यात यामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

एकूण भारतातील शेतीचे चित्र खूपच आशादायक आहे. मात्र, यामध्ये भविष्यातही शेतकऱ्यांना कितपत चांगला भाव मिळेल याबाबत अनेकांना शंका वाटत आहे. कारण, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल प्राथमिक प्रक्रिया करून त्यानंतरच जास्त भावाने विकला जात आहे. त्यामुळे यातून शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्यासाठी शेतकऱ्यांनाच काहीतरी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here