रसिक ग्रुपच्या येलुलकरांचे महापलिका अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र; नेहमीच मान खाली घालून उभा असलेला एक नगरकर…

अहमदनगर :

मोसमी पावसामुळे अहमदनगर शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. ढिसाळ महापालिका अधिकारी आणि अकार्यक्षम असणाऱ्या पुढाऱ्यांमुळे नगर शहराची मुंबईसारखीच तुंबई झाली आहे. त्यावरून नगर शहरात संताप व्यक्त होत असताना रसिक ग्रुपचे सर्वेसर्वा जयंत येलूलकर यांनी महापलिका अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

महापालिका नगररचना,महसूल, भूमी अभिलेख यांना लिहिलेल्या पत्रात येलूलकर यांनी म्हटले आहे की, सन्माननीय साहेब, सस्नेह नमस्कार, नगर शहरातील सगळे नैसर्गिक ओढे, नाले संगनमताने बुजवले तुम्ही, बरंच झालं.. या बदल्यात तुम्हालाही चांगले पैसे मिळाले असतीलच.. तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे.. हे सगळ करत असताना तुम्हाला कोणी काही बोललं का? नाहीं ना.. अहो, कधीच बोलणार नाही आमचे बिच्चारे नगरकर..
किती वर्षे मान खाली घालून जगत आहोत आम्ही..ती सवयच होऊन गेलीय आम्हाला आता…

पुढे त्यांनी खरमरीत भाषा वापरत अधिकारी आणि पुढाऱ्यांना टोलाही लगावला आहे. ते म्हणाले की, आज वीस मिनिटांच्या पावसाने सगळ शहर कसं पाण्यात बुडाल्यासारख वाटलं..किती छान.. शहर धुतल्याच समाधान…
स्वच्छ झालं आमचं महानगर.अधून मधून असं व्हायलाच हवं. म्हणूनच फार बरं झालं ओढे बुजवून..
आमच्या दलालांनीही तुम्हाला यासाठी खूप मदतही केली.. त्यांचे आभारही कोणत्या शब्दात मानावे..
साहेब, कशी आहेत आमची इथली माणसं.. चागली,भोळी आहेत ना.. म्हणूनच असं देवकार्य चालूच ठेवा..एक आग्रहाची विनंती करू का साहेब.. तेवढी सीना नदीही बुजवता येते का पहा..खूप सारे पैसे मिळतील तुम्हा सगळ्यांना..
नाहीतरी सिना आता कोरडीच आहे..वय ही खूप झालंय आता तिचं….हळूच गळा दाबा तिचा, क्षणात मान टाकेल ती..
मरायलाच टेकली आहे.. आम्ही तरी किती करायचं तिचं..म्हणजे मग पाऊस झाला की बोटीही फिरवता येतील या गल्लीतून त्या गल्लीत…घाबरु नका,तेवढं काम कराच साहेब… स्वताच्या पोराबाळांच्या हिताचं पहा …त्यांच्या भविष्याचा विचार करा.. पुण्या, मुंबईत त्यांना आलिशान फ्लॅट घेऊन द्या म्हणजे मग आम्हालाही काही पुंण्याचं काम झाल्याचं समाधान मिळेल.
साहेब, करा तेव्हढ काम, बुजवा नदी.. घोटा तिचा गळा..
इथे तुम्हाला कोणी विचारायलाही येणार नाही..
मग, जेलमध्ये टाकायचं तर सोडाच..
तुम्हाला माहिती आहे ना आम्ही कसे …. डू आहोत..
तर मग करता ना सुरुवात, शहराच्या नकाशाची खाडाखोड करायला…

आपला नेहमीच मान खाली घालून उभा असलेला एक नगरकर जयंत येलूलकर

********

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here