कंपाऊंडरची औषधे खाऊन त्यांची ‘ही’ अवस्था झाली; ‘या’ भाजप नेत्याची टीका

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे गेल्या २ दिवसांपासून एकमेकांवर टीका करत आहेत. या दरम्यान राऊत यांनी टीका करताना हरामखोर या शब्दाचा वापर केला. नंतर प्रकरणाची सारवासारव करताना हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी असा आहे, असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर ‘हरामखोर‘ म्हणजे ‘नॉटी’ तर मग ‘संजय राऊत’ म्हणजे ‘लंगोटी‘, असे म्हणत भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी राऊतांची खिल्ली उडविली आहे.

राणे ट्वीट करत म्हणाले की, ‘हरामखोर‘ म्हणजे ‘नॉटी’ तर मग ‘संजय राऊत’ म्हणजे ‘लंगोटी‘. संजय राऊत यांनी परत माती खाल्ली. कंपाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संज्याची ही अवस्था झाली आहे.

त्यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. बाबुराव साठे यांनी म्हटले आहे की, सेनेच्या विरोधात कायम टीका करत राहणे इतकेच काम का तुमच्याकडे फक्त ,त्याच सेनेमुळे राणे ची ओळख महाराष्ट्र मध्ये झाली हे विसरलात की काय?

दरम्यान राणे यांच्या समर्थन करणारे ट्वीटही आहेत. कुमार चव्हाण यांनी म्हटले आहे की, समोरच्याला ज्या भाषेत कळत त्यांचं भाषेत निलेश राणे बेधडक उत्तर देतात. आधी संजय राऊतनी भाषा सुधारावी. हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल ? ही कुठली भाषा स्त्रीयांना वापरता. लाज वाटली पाहिजे शिवसेनेला.. एका बाईला अपशब्द वापरता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here