व्होडाफोन-आयडियाचा नवा अवतार; जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी कंपनी उतरतेय नव्या जोमात

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ सेवेने फोरजी मोबाइल सेवेमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पाठीमागून येऊन या कंपनीने अनेक दिग्गज कंपन्यांना मागे सारले आहे. जगातील एक नामांकित कंपनी असलेल्या व्होडाफोनलाही त्याचा झटका बसला आहे. मात्र, आता आयडियाच्या संगतीने ही कंपनी जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी नव्या अवतारात उतरत आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

होय, नवा अवतार म्हणजे नवीन रंग आणि ढंग यासह ही कंपनी बाजारात अवरीर्ण झालेली आहे. त्यांनी आपल्या दोन्ही लोगोंना एकत्र करून व्हीआय (VI) नावाच्या नवीन लोगोसह पुन्हा नवी उभारी घेण्याची जिद्द ठेवली आहे. व्हिक्टरी या अर्थाने हे दोन्ही ब्रांड एकत्र येऊन आता जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी सज्ज झालेले आहे. ग्राहकांनी आणि बाजारानेही याचे दमदारपणे स्वागत केले आहे.

रिलायन्स कंपनीच्या जिओची मोनोपॉली झाल्यावर निर्माण होणाऱ्या भीतीने आताच ग्राहकांना घेरलेले आहे. अशावेळी भारतीय कंपनी असलेल्या एअरटेलवरही ग्राहकांनी विश्वास दाखवण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हीआय कंपनीही सज्ज झालेली आहे. सीईओ रविंदर टक्कर यांनी याबाबत म्हटले आहे की, ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कंपनी जोमात काम करीत राहणार आहे. त्यासाठी काही शुल्कवाढ होऊ शकते.

तर, कर्जाच्या खाईत असलेल्या या कंपनीला सावरण्यासाठीच्या तयारीत असलेल्या आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला मोठी भूमिका बजावत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, १९९० पासून दोन्ही कंपन्या ग्राहकांना सेवा देत आहेत. देशात तेंव्हापासून नेटवर्क एक्सपीरियंस, रूरल कनेक्टिविटी, कस्टमर सर्विस आणि एंटरप्राइज मोबिलिटी सॉल्यूशंस यामध्ये कंपन्यांनी बेस्ट काम केले आहे. यापुढेही अशीच सेवा देताना डिजिटल अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कंपनी कटिबद्ध राहणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here