म्हणून नंबर १ खेळाडूलाही US ओपनमधून डच्चू; वाचा स्पोर्ट्समधील महत्वाची बातमी

सर्बिया देशाचा टेनिस स्टार आणि सध्या जगातील क्रमांक एकवर असलेल्या नोवाक जोकोविच याला अमेरिकन ओपन स्पर्धेतून डिस्क्वॉलीफाई करण्यात आलेले आहे. एका महिला अधिकाऱ्यांना टेनिसचा चेंडू लागल्याने त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

रविवारी स्पेनच्या पाब्लो करेनो बुस्टा या खेळाडूसमवेत सुरू असलेल्या लास्ट-16 (प्री क्वॉर्टर फाइनल) सामन्यात 5-6 सेटने पिछाडीवर पडल्याने जोकोविच वैतागला होता. अशावेळी त्याने वैतागून एक बोगस पद्धतीने चेंडू टोलवला. हा चेंडू नेमका एका महिलेला लागला. त्यात ती जखमी झाली. या कारणामुळे जोकोविच याला युएस ओपन या मोठ्या स्पर्धेतून डच्चू देण्यात आलेला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

जोकोविच याने टोलावलेला चेंडू महिला अधिकाऱ्याला लागल्याचे पाहताच त्याने तिकडे धाव घेतली. मात्र, चूक ही चूक असते, मग तो खेळाडू कितीही महान असो. याच न्यायाने या सामन्यात 10 मिनिटे चर्चा करून स्पेनच्या पाब्लो करेनो बुस्टा या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. तर, आता जोकोविचला डिस्क्वॉलीफाई घोषित करण्यात आलेले आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धेतील अशा पद्धतीने खेळाडूंना डिस्क्वॉलीफाई करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 1990 मध्ये जॉन मौकेनरो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आणि 2000 मध्ये स्टफान कोबेक यास फ्रेंच ओपन स्पर्धेतून डिस्क्वॉलीफाई करण्यात आलेले होते. जोकोविच याला स्पर्धेचा प्रमुख विजयी दावेदार मानले जात होते. त्याने आतापर्यंत 17 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तर, त्याच्यापेक्षा जास्त फ़क़्त राफेल नदाल १९ आणि रॉजर फेडरर २० यांनीच सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

संपादन : सचिन पाटील

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here