त्यानिमित्ताने शिवसेना झालीय ट्विटरवर ट्रोल; पहा भाजप नेते व पत्रकार काय म्हणालेत ते

मुंबई :

राज्यात करोनाचा आहार जोमात असताना आणि संशयास्पद पद्धतीने आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंग याचे प्रकरण जोमात असतानाच कुप्रसिद्ध डॉन दाउद इब्राहीम याच्या टोळीकडून मातोश्रीवर धमकीचा फोन आल्याची बातमी धडकली आहे. शिवसैनिकांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांच्याबद्दल आस्था व्यक्त केलेली असतानाच भाजप नेते व पत्रकार यांनी यावरून सेनेला ट्रोल केले आहे.

याबद्दल निलेश राणे यांनी म्हटलेय की, दाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन… मंत्र्यांचे फोन उचलत नाही अन दाऊदचा लगेच उचलला? तर, भाजपचे सुपरस्टार प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलेय की, दाऊदच्या फोनची सुक्की हुल ही अनंत अपयशातुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याची व सहानुभूती निर्माण करण्याची ‘फसलेली’ खेळी आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिल्येय की, Today I called my partner and asked him to get me my profit share. आज मी माझ्या भागिदाराला फोन करून धंद्यातल्या फायद्यातला माझा हिस्सा मागीतला.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

विश्वास पाठक यांनी लिहिल्येय की, मातोश्री वर आमदाराचा चे फोन उचलत नाहीत, दाऊद चा बरा लगेच उचलला ? आणि एबीपी न्यूज हिंदी यांचे पत्रकार यांनी म्हटले आहे की, अब दाऊद को हरामखोर कहने की हिम्मत है क्या ? तर, भाजपचे आमदार राम सातपुते यांनी एक व्हीडीओ ट्विटरवर टाकून लिहिले आहे की, एकेकाळी खा.संजय राऊत यांनी दाऊदला दम दिला होता असे ते म्हणतात मग मातोश्री वर फोन करून धमकी द्यायची हिम्मत कशी काय केली …??

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here