ब्रेकिंग : राज्य सरकारमुळे घसरला जीडीपी; पहा SBI च्या अहवालात कोणती माहिती आलीय पुढे

देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे एकतर देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलीच मात्र, त्यामुळे करोना विषाणूचे संक्रमणही कितपत कमी झाले याबद्दल उलटसुलट चर्चा आहेत. त्यातच आता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी एक अहवाल प्रसिद्ध करून राज्य सरकारांनी मनमानी पद्धतीने लॉकडाऊन न करण्याचे आवाहन केले आहे. असा लॉकडाऊन लागू करून जीडीपीच्या घसरणीत मोठे योगदान दिल्याचे म्हटले आहे.

नवभारत टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने ऑनलाईन बातमीत याची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, SBI च्या अहवालात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगढ़, मिजोरम आणि महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यात राज्यस्तरीय अंशतः लॉकडाऊन लागू केल्याच्या काळातही रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्हे, त्यावेळी वृद्धीदर जास्त राहिला आहे. त्याचवेळी सर्व व्यवहार ठप्प असल्याने अर्थव्यवस्था आणखी संकटात येण्यास मदत झाली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

त्याच बातमीत दावा करण्यात आलेला आहे की, केंद्र सरकारने ४ टप्प्यांमध्ये लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशात करोनाचे संक्रमण खूप कमी होण्यास मदत झाली. तसेच त्याच कालावधीत देशभरात आरोग्य सुविधा आणखी चांगल्या करण्याचाही कालावधी मिळाला. एकूणच जुलै महिन्यात ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या स्थानिक भागात कुठेही अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला तिथे अर्थचक्र बाधित होऊन परिस्थिती आणखी बिघडली आहे असेच त्या अहवालात म्हटले आहे.

बातमीत म्हटले आहे की, एसबीआई की रिपोर्ट कहती है, ‘राज्यों ने जुलाई और अगस्त में आंशिक लॉकडाउन लागू किए। हालांकि, इससे कोविड-19 केस में कमी नहीं आई। इसलिए राज्यों को मानसिक तौर पर स्वघोषित लॉकडाउन से बाहर आ जाना चाहिए।’

मूळ बातमीची लिंक : https://navbharattimes.indiatimes.com/india/unplanned-full-and-partial-lockdowns-in-states-heavily-impacted-economic-activities-that-manifested-in-latest-gdp-data/articleshow/77970183.cms

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here