‘त्या’ बँकेच्या २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही येणार गंडांतर; पहा मंत्री काय म्हणतायेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात नोकऱ्या कमी होत असल्याचे अहवाल वेळोवेळी समोर येत आहेत. BSNL या एकेकाळी दिग्गज असलेल्या कंपनीत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याची बातमी ट्रेंडमध्ये असतानाच आता एका मोठ्या सरकारी बँकेतून २० हजार जणांना काढून टाकले जाणार असल्याचा आरोप होत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करणाऱ्या 30,000 कर्मचाऱ्यांना मोदी सरकार जबरदस्तीने VRS घ्यायला लावत त्यांना कामावरून कमी करणार.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

सेवानिवृत्ती घ्यायला लावून नोकरदारांना घरी बसवण्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मोदी सरकार, सरकारी कंपनी असनाऱ्या LIC मधील 25% हिस्सेदारी विकणार.LIC ही स्वायत्त संस्था आहे तसच तीच संचलन हे 1956 LiC ऍक्ट प्रमाणे होते.या कायद्यानुसार LIC डायरेक्ट विकता येत नाही.त्या कायद्यात सुधारणा करून हा प्रस्ताव संसदेच्या येत्या सत्रात मांडण्यात येणार आहे.

एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेंडमध्ये येणार आहे. अशा पद्धतीने नोकऱ्या काढून घेऊन ग्राहकांच्या किंवा देशाच्या हिताचे नेमके कोणते कार्य साधले जाते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here