ये राधिका, हॅपी बर्थडे यार..!

राधिका आपटे म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र आलं? जे आले असेल ना तीच तिची ओळख आहे.. एकदम भन्नाट आणि कसदार अभिनय करणारी आणि सौंदर्याने नाही पण आपल्या रसदार अभिनयाने रसिकांना मोहिनी घालणारी ही भन्नाट अभिनेत्री आहे. 

एकतर ती तुम्हाला खूप आवडते, किंवा तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारांनी ती तुम्हाला तिरस्कार करावीशी वाटू शकते. मात्र, तीच तर तिची खासियत आहे. कारण, तिच्या विचारांशी ती ठाम आहे, त्याच्याशी प्रामाणिकही.. म्हणूनच तिची दखल घ्यावी लागते. नाहीतर कित्येकजणी वाढदिवस साजरा करतात. पण ही नेहमी खास असते आणि राहीलही..

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

अशा या चित्रपट सृष्टीतील एका प्रतिभावंत अभिनेत्रीचा आज वाढदिवस. सध्या चित्रपट सृष्टी झपाट्याने बदलत आहे. याच बदलाच्या काळामध्येसुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर काही सिने अभिनेत्यांची, अभिनेत्रीची नावे रसिकांच्या जिभेवर रेंगाळत असतात. त्या पैकीच एक नाव म्हणजे राधिका आपट..!

आपल्या बिनधास्त अंदाजात वावरणार्‍या या अभिनेत्रीचा जन्म हा 7 सप्टेंबर 1985 रोजी तमिळनाडूमध्ये झाला. राधिकाचे वडील हे पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटलचे चेअरमन होते. कसलेही चित्रपट सृष्टीतील फॅमिली बॅकग्राऊंड नसतानासुद्धा राधिकाने मराठी, हिन्दी, तेलगू, तामिळ, मल्याळम अशा विविध भाषेत चित्रपट केले आहेत. राधिका आपटे या उच्चशिक्षित आहेत, आहो-जाहो वाचून गुचाकी लागली की काय..? हरकत नाही, पण मला त्या आदरणीयही वाटतात ना..

त्यांनी गणित आणि वाणिज्य शाखेमधून शिक्षण घेतले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी तिला बॉलीवुडमध्ये पहिला रोल मिळाला होता. राधिकाने बदलापूर, पॅडमॅन, कबाली, फोबिया, अंदाधुंद आदि यशस्वी चित्रपट दिले आहेत. सध्या तिला डिजिटल प्लॅटफॉर्मची क्वीन म्हणून ओळखले जाते. वेब सिरिजच्या माध्यमातून तरुणाईला आपल्या अभिनयाच्या जोरावर वेडं करून टाकणार्‍या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

लेखक : गणेश शिंदे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here