म्हणून पुणेकरांकडून १ कोटींचा दंड केला वसूल; आरोग्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती

करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराची वेगाने फोफावत आहे. देशभरात दररोज हजारो नवे रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वेगाने नवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. अशावेळी नागरिक काही नियमनाचे पालन करून सरकारला सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे. त्यासाठीच पुणेकरांकडून राज्य सरकारने तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

होय, हा दंड आहे मास्क न घालता बोंबलत फिरणाऱ्या मंडळींचा. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाहेर फिरणारे किमान ३० टक्के नागरिक अजूनही गांभीर्याने मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यातच लॉकडाऊन उघडल्याने आता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हेच समाज विसरला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिलेली असली तरीही यामध्ये हेल्मेटमध्ये मास्क न घातलेले किंवा एकटे असूनही कारमध्ये मास्क न घालत गाडी चालवत असलेल्या किती जणांकडून पोलीस, महापालिका व सरकारी यंत्रणेने किती प्रमाणात दंड वासून केला आहे, यावर त्यांनी सांगितलेले नाही. हेल्मेटची काच आणि मास्क यामुळे अनेकांना गुदमरून जाण्याचा त्रास होत आहे. तर, गाडीत एकटा किंवा आपलेच कुटुंबीय असल्याने मास्क न घालणारेही खूप आहेत. अशा मंडळींकडून दंड वसूल केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अजूनही या दोन्ही घटकांकडून (हेल्मेटमध्ये मास्क न घातलेले किंवा एकटे असूनही कारमध्ये मास्क न घालत गाडी चालवणारे) यांच्याकडून दंड घ्यावा किंवा घेऊच नये यावर स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. एकूणच मास्क न घातलेल्या नेमक्या कोणाकडून दंड वसूल करायचा याचीच नियमावली तयार नाही. नागरिक आणि सरकारी यंत्रणेमध्ये हा सावळागोंधळ काही मिटण्याची चिन्हे नाहीत हे दुर्दैव..!

संपादन : विनोद सूर्यवंशी

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here