मोदी सरकारकडून महाराष्ट्राची ‘मुस्कटदाबी’; पहा आरोग्य मंत्र्यांनी नेमके काय म्हटलेय ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला एक पत्र पाठवण्यात आलेले आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, मास्क, पीपीई कीट आणि व्हेंटीलेटर यांचा पुरवठा यापुढे केंद्र सरकार महाराष्ट्राला करणार नसल्याचे त्यात म्हटलेले आहे.

याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, लॉकडाऊन उठवल्याने आता लोकांचा एकमेकांशी जास्त प्रमाणात संपर्क येत आहे अशावेळी रुग्णांची संख्यावेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या रुग्णांच्या टेस्ट पॉजिटिव्ह आलेल्या आहेत, मात्र लक्षणे अजिबात नाहीत त्यांनी दवाखान्यात जाऊन बेड अडवू नये. अशा मंडळीनी सेल्फ क्वरंटाइन राहून सहकार्य करावे. तसेच त्या कालावधीत त्यांनी इतरांशी संपर्क पूर्णपणे टाळावा.

टोपे यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या बिकट परिस्थिती आहे. लोकांनी त्यासाठी सहकार्य करावे. अनेकजण अजूनही सहकार्य करीत नाहीत. त्यातच केंद्र सरकारने पीपीई कीट आणि व्हेंटीलेटर यांचा पुरवठा न करण्याचे पत्र पाठवून दिलेले आहे. आम्ही याबाबत नुकतीच पुण्यात केंद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाही याबाबत पत्र लिहिलेले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येऊन पुन्हा एकदा या वस्तूंचा नियमित आणि योग्य प्रमाणात पुरवठा होईल अशीच अपेक्षा आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

जम्बो कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटरसहित बेड आणि सहा जिल्ह्यात नव्याने टेली-आयसीयू सुरू करण्यात आलेले आहेत. सगळीकडे रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ यांच्यासाठी मास्क, पीपीई कीट आणि व्हेंटीलेटर यांची खूप आवश्यकता आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडे आम्ही याबाबत पाठपुरावा करीत आहोत.

संपादन : सचिन मोहन चोभे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here