करोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा एका दिवसात किती वाढलेत रुग्ण तेही

मुंबई :

राज्यातील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट टाकलेल्या आहेत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

मंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्यात आज 23350 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7826 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 644400 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 235857 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.03% झाले आहे.

हे रोजच्या अपडेट देणारे महत्वाचे ट्विट केल्याच्या अगोदरच त्यांनी म्हटलेले आहे की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० % व उद्योगांसाठी २० टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहील.यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० % आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० % या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण ८० % वैद्यकीय क्षेत्रासाठी तर २० %उद्योगांसाठी असे करण्यात आले. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत.

एकूणच लॉकडाऊन उघडल्यावर लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे. त्यातच काहीजणांनी करोनाची भीती न घेण्याचे म्हणत मास्क न घालीत बोंबलत फिरण्याची सुरुवात केली आहे. अशावेळी राज्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाला याबाबत ठोस अशी नियमावली आणि जनतेला त्याचे पालन करण्याची तसदी घ्यावी लागणार आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here