ब्रेकिंग : म्हणून अर्थव्यवस्था रसातळाला; पहा कोणाच्या लॉकडाऊनचे नेमके काय इफेक्ट झालेत ते

करोना विषाणूच्या आपत्कालीन परिस्थितीत जगभरातील अर्थव्यवस्था संकटात आहेत. अशावेळी भारताची अर्थव्यवस्था मात्र खालून पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची जबाबदारी नेमकी कोणाची यावरून राजकारण जोमात आहे. त्याचवेळी स्टेट बँकेच्या अहवालात राज्यांनी आता लॉकडाऊनच्या मानसिकतेतून बाहेर येण्याचे म्हटले आहे. तर, केंद्र सरकारने चार टप्प्यांमध्ये केलेला लॉकडाऊन सक्सेस झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

सुप्रसिद्ध हिंदी दैनिक नवभारत टाईम्स यांनी याबाबतची एक बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या एका अहवालाचा दाखला दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने अंशतः लॉकडाऊन लागू करण्याचे अधिकार राज्य सरकारांनी योग्य पद्धतीने वापरलेले नाहीत. त्या अहवालात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगढ़, मिजोरम आणि महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यात राज्यस्तरीय अंशतः लॉकडाऊन लागू केल्याच्या काळातही रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्हे, त्यावेळी वृद्धीदर जास्त राहिला आहे. त्याचवेळी सर्व व्यवहार ठप्प असल्याने अर्थव्यवस्था आणखी संकटात येण्यास मदत झाली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

तर, त्याच बातमीत पुढे म्हटलेले आहे की, केंद्र सरकारने लागू केलेल्या चार टप्प्यातील लॉकडाऊनमुळे देशातील रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. तो प्रयत्न खूप यशस्वी ठरला आहे. अशा पद्धतीने एकाच बातमीत वेगवेगळे संदर्भ आहेत. मात्र, त्याद्वारे असे स्पष्ट दिसते की, गृहमंत्रालयाने लागू केलेल्या लॉकडाऊनचा देशातील जनतेला मोठा फायदा झालेला आहे. त्याचावली राज्य सरकारांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे.

कोणत्याही गोष्टीची जबाबदारी न घेण्याची आणि ती इतरांवर ढकलण्याची भारतीय परंपरा सरकारी यंत्रणेतही वेळोवेळी दिसते. इतरांना बळीचा बकरा जाहीर करून आपण नामानिराळे होण्याचा हा भारतीय फंडा आहे. बरे, ज्या कोणावर बेजबाबदार असा शिक्का मारला जातो त्याच्यावरही कारवाई होत नाही. मग नेमका बेजबाबदार कोण असाच प्रश्न निर्माण होतो. मात्र, त्याला उत्तर असते ती सामूहिकरीत्या केलेल्या बेजबाबदारीचा कळस. असाच प्रकार कमी झालेल्या जीडीपीच्या प्रकरणात दिसत आहे.

मूळ बातमीची लिंक : https://navbharattimes.indiatimes.com/india/unplanned-full-and-partial-lockdowns-in-states-heavily-impacted-economic-activities-that-manifested-in-latest-gdp-data/articleshow/77970183.cms

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here