सुशांतचा मुद्दा बनतोय बिहारींच्या निवडणुकीचा अजेंडा; पहा चाललेय तिकडे

सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याची आत्महत्या हाच बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा बनली आहे. सत्ताधारी भाजपने करोना, वाढती बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि इतर सामाजिक मुद्द्यांवरून लक्ष पांगवण्यासाठी सुशांत सिंग हाच अजेंडा बनवून टाकला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्या आणि त्याच्याशी निगडीत विषयावर खूप साऱ्या चर्चा सुरू असतात. टीव्ही वाहिन्यांवर, पेपर अशा विविध ठिकाणी या आत्महत्येवरून चर्चा सुरू असतात. मात्र या घटनेला आता थोडा वेगळेच वळण मिळाले आहे. बिहार येथील निवडणूक लक्षात घेऊन “ना भुले हैं ! ना भुलने देंगे”  अशा आशयाची पोष्टर पटना येथे बीजेपी मुख्यालय येथील कला व सांस्कृतिक विभागात लावण्यात आली आहेत. 

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

अशा आशयाचे फोटो आणि ट्विट सध्या ट्विटरवर काही ट्विटर हॅण्डल वरून टाकण्यात आले आहेत. मात्र, भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावर असे काहीही अजूनही म्हटलेले नाही. त्याचवेळी देशभरातील भाजप नेत्यांनी या अभिनेत्याच्या आत्महत्येला महत्व दिले आहे. बिहारमध्ये भाजपची प्राचाराची धुरा वाहणारे देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्याला खूप महत्व दिलेले आहे. यावरून एक गोष्ट निश्चित जाणवते आहे की बिहार च्या निवडणुकीत सुशांत सिंग राजपूतचे नाव घेऊन प्रचार केला जाईल असा अंदाज वर्तवला जातो आहे. 

संपादन : गणेश शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here