‘त्या’ छोट्या कंपन्यांनी दहाच वर्षांमध्ये १० हजारांचे केलेत ‘इतके’ लाख; वाचा शेअरची कमाल

शेअर बाजारात अनेकांचे आडाखे खोटे ठरले आहेत, तर काहींचे अगदीच परफेक्ट. ज्यांनी कंपन्या, बाजाराचा ट्रेंड आणि भविष्यकालीन मार्केट यांचा अभ्यास करून योग्य अंदाज ठिकाणी गुंतवणूक केलेल्यांना मस्त पैसे मिळाले आहेत. काहींचे हजारांचे लाख, तर लाखाचे कोटीही याच पद्धतीने झालेले आहेत. अशावेळी काहींनी लाखाचे बारा हजरही केलेत. मात्र, ज्यांनी अभ्यास करून आणि बोगस टिप्स न ऐकता गुंतवणूक केली त्यांना शेअर बाजाराने भरभरून दिलेले आहे. आज आपण अशाच दोन छोट्या कंपन्यांची माहिती पाहणार आहोत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

यापूर्वीच्या एका लेखात आपण अवंति फीड्स आणि कैपलिन प्वॉइंट लिमिटेड यांनी कसे दहाच वर्षांमध्ये १० हजार रुपयांचे थेट २५ लाख करून दाखवले याची माहिती वाचली होती. आज आपण पाहणार आहोत की, वेस्टलाइफ डेवलपमेंट लिमिटेड आणि अल्काइल एमीन्स केमिकल लिमिटेड या कंपन्यांनी कशा पद्धतीने फ़क़्त दहाच वर्षांमध्ये फ़क़्त इन्व्हेस्टर मंडळींचे पैसे वाढले आहेत.

अल्काइल एमीन्स केमिकल लिमिटेड या कंपनीने १० वर्षांमध्ये ७ हजार ४०० टक्के इतकी जोरदार वाढ नोंदवली आहे. दहा वर्षांपूर्वी ४५ रुपयांना असलेल्या त्या कंपन्यांचा शेअर सध्या थेट ३ हजार ३७५ रुपये इतका वाढलेला आहे. या कंपनीनेही ३६०० रुपयांच्या भावाला शिवून येण्याची किमया साधली आहे. आताही या कंपनी उत्तम कामगिरी करीत आहे. मागील तिमाहीत या स्पेशिएलिटी केमिकल बिजनेसमधील कंपनीने ५२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

तर, फास्ट फूड रेस्टोरेंट होल्डिंग क्षेत्रातील वेस्टलाइफ डेवलपमेंट लिमिटेड कंपनीने मागील दहाच वर्षांमध्ये थेट ११, २४७ टक्के ग्रोथ नोंदवली आहे. त्यावेळी ३.५ रुपयांना असलेला हा शेअर ३७५ रुपये किमतीला आहे. त्याचबरोबर या शेअरने ५०० रुपये किमतीला शिवून येण्याची किमया केली आहे. लॉकडाऊन कालावधीत या कंपनीला काहीअंशी फटका बसला असून ५७ कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे.

संपदान : सचिन मोहन चोभे

ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here