गुड न्यूज : शेतकऱ्यांना कर्ज योजनेसाठी RBI ने केले ‘हे’ दिशानिर्देश जारी; वाचा महत्वाची बातमी

भारतीय रिझर्व बँक यांनी भारतीय शेतकऱ्यांना एक महत्वाची गुड न्यूज दिली आहे. होय, अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना देशाला सावरण्याची जबाबदारी शिरावर घेतलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काहीअंशी का होईना दिलासा मिळणार आहे. RBI ने सौर विद्युत पंप आणि बायोगॅस संयंत्र यासाठी कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठीच्या सूचना जारी केलेल्या आहेत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

RBI ने प्राथमिकता क्षेत्रांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करून या दोन्हींसाठी भरभरून कर्ज देण्याच्या सूचना जरी केलेल्या आहेत. एकूणच यानिमित्ताने शेतकऱ्यांना आपल्या शेती आणि घरासाठी अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळणार आहे. कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसह या दोन्ही उपकरणांना प्राधान्याने कर्ज देण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्राथमिकता क्षेत्र ऋण (पीएसएल) यामध्ये या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सौर विद्युत पंप आणि बायोगॅस संयंत्र यांच्यासाठी मिळणाऱ्या कर्जामध्ये वाढ करण्याच्या सूचना आहेत. तसेच यामध्येही शेतकरी उत्पादक कंपन्यांना भरभरून कर्ज देण्याची सोय करण्यात आलेली आहे. तर, स्टार्टअपसाठी कर्जमर्यादा थेट ५० कोटी रुपये इतकी करण्यात आलेली आहे. यासाठी काही जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये तर या योजनेतून अधिकाधिक कर्ज देण्यासाठीचे प्रयत्न होणार आहे.

एकूणच केंद्र सरकार आणि RBI यांनी आता शेती क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन या सेक्टरला उभारी देणारा हा निर्णय घेतला आहे. फ़क़्त बँक अधिकारी या योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांनी कसा देतील याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. नाहीतर इतर योजनांप्रमाणे याही योजनेचा फज्जा हे ‘कर्तव्यदक्ष’ अधिकारी नक्कीच वाजवतील की..!

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here