भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सल्ला दिला आहे. त्यावर शशिकांत चौगुले यांनी आठवलेंना भन्नाट सल्ला देऊन टाकला आहे.
“कोंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधी ही तयार नाहीत. माझी कॉंग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे. या बाबतचा निर्णय पवार आणि कॉंग्रेस यांनी घ्यावा”. असे त्यांनी ट्विट आठवले यांनी केले होते.
मात्र याच बातमीला एका ट्विटर हॅंडल वरुण सुचवण्यात आले आहे की “रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी अमेरिकन रिपब्लिकन पार्टी मध्ये विलीन करून त्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करावे. असा सल्ला आठवले यांना दिल्याचे हे ट्विट बीबीसी न्यूज मराठी ने रिट्विट केले आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांना व्यक्त होत असताना जपून व्यक्त व्हावे लागत आहे. कारण कोणत्या मुद्याची कधी खिल्ली उडवली जाईल सांगताच येत नाही. थेट प्रश्न विचाराने माध्यमांच्या सुलभते मुले सहज शक्य झाले आहे.
ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.
ट्विटरवर मराठी तरुणाई सक्रीय आहे. चौगुले यांच्या ट्विटची दखल बीबीसी मराठीने घेतली आहे. एकूणच यामुळे पुन्हा एकदा रामदास आठवले ट्रेंडमध्ये आलेले आहेत.
संपादन : गणेश शिंदे