झुनझुनवालांचा पोर्टफोलिओ आहे असा; पहा करोना काळावरही कशी करीत आहेत ते मात

मार्केटमध्ये कोणत्याही वेळेत संधी शोधण्याची तयारी ठेवून इन्व्हेस्टमेंट करावी लागते. काहीतरी कारणाने योग्य वेळी माघार घेण्यासह चालून आलेली योग्य वेळेची संधीही साधावी लागते. वाचक मित्र-मैत्रिणींनो, आताच्या करोनाच्या जागतिक संकटातही मार्केट जोमात आहे. मागील काही दिवस वगळता विस्तारत असलेल्या मार्केटच्या पैशांमध्ये वाढच झालेली आहे. अशावेळी आता आपण पाहूयात सुप्रसिद्ध इन्व्हेस्टर राकेश झुनझुनवाला यांनी कुठे अशी कशी गुंतवणूक करून ठेवली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

मार्चमध्ये मार्केट खाली पडल्यावर अनेकांना वाटले की आता काहीच खरं नाही. अनेकांनी आपल्याकडे असलेले चांगल्या कंपन्यांचे शेअर विकून टाकले. मात्र, त्याच कालावधीत आणि त्यानंतर तिमाहीत अनेकांनी बाजारावरील विश्वास पक्का असल्याचे सूचित करताना काही शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली; तर काही कंपन्यांमध्ये नव्याने गुंतवणूक करून टाकली. झुनझुनवाला यांनीही असेच निर्णय कंपन्या आणि बाजाराचा अभ्यास करून घेतलेले दिसतात.

त्यांनी NCC लिमिटेड यामध्ये आपली हिस्सेदारी १.२३ टक्के केली आहे. सध्या या कंपनीचे त्यांच्याकडे २३६.४ कोटी रुपयांचे शेअर आहेत. तर, टाटा ग्रुपच्या कृषी व रासायनिक क्षेत्रातील कंपनीत त्यांनी ०.३८ टक्के इतकी गुंतवणूक वाढवून १०.३१ टक्के केली आहे. तसेच जुबिलेंट लाइफ साइंस, फेडरल बँक आणि Firstsource सॉल्यूशंस या कंपन्यांमध्ये त्यांनी अनुक्रमे ०.७०, ०.१० आणि ०.८२ टक्के इतकी भागीदारी वाढवली आहे.

त्याचबरोबर नव्याने त्यांनी याच कालावधीत डिशमैन कार्बोजेन यामध्ये ३.१८ टक्के, आटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड ६.४८ टक्के, इंडियन होटल्स यामध्ये १.०५ टक्के इतकी गुंतवणूक केली आहे. हे करतानाच त्यांनी अॅग्रो टेक फूड यामध्ये असलेली गुंतवणूक काही प्रमाणात कमी केली आहे. या करोनाच्या संकट काळातही त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुसंख्य शेअरमध्ये चांगली वाढ झालेली आहे. एकूणच त्यांनी या मंदीतही उत्तम संधी साधली आहे. त्यामुळे आपणही अभ्यास करून व योग्य टिकाणी गुंतवणूक करून अशी संधी साधू शकता.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here