दमानी व कचोलियांचा ताजा पोर्टफोलिओ पहायचाय; मग ही माहिती वाचा की

भारतीय शेअर बाजारातील दिग्गज इन्व्हेस्टर म्हणून डीमार्टचे राधाकिशन दमानी आणि आशीष कचोलिया यांची ओळख आहे. मार्च महिन्यात करोनाचा कहर अवघ्या जगावर कोसळला. शेअर बाजारही मग प्रतिक्रिया देत खाली आला. अनेकांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी आपल्याकडील चांगल्या कंपन्यांचे शेअर विकून टाकले. अशावेळी दिग्गज गुंतवणूकदारांनी बाजारावर विश्वास कायम असल्याचे दाखवून देत आपली गुंतवणूक वाढवली. त्यातलेच हे दोघे गुंतवणूकदार आहेत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

दोघांनीही कंपन्यांच्या सर्वांगीण अभ्यासातून आपली गुंतवणूक वाढवली आहे किंवा काही ठिकाणी नव्याने गुंतवणूक केली आहे. दमानी यांनी मंगलम ऑर्गेनिक्स यामध्ये २.१७ टक्के शेअर खरेदी केले आहेत. तर, नव्याने कोणत्याही कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या यादीत बीएफ यूटिलिटीज (१.३० टक्के), एस्ट्रा माइक्रोवेव (१.०३ टक्के) या दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहे. त्याचवेळी इंडिया सीमेंट या त्यांच्या लाडक्या कंपनीतील स्वतःची गुंतवणूक त्यांनी १२.१४ टक्क्यांवर नेली आहे.

आशीष कचोलिया यांनीही HLE ग्लासकोट यामध्ये १.०३ टक्के, अपोलो ट्राईकोट ट्यूब १.९८ टक्के इतकी नव्याने गुंतवणूक केली आहे. तर, DFM फूड्स आणि KPIT टेक्नोलॉजी यांच्यामधील गुंतवणूक त्यांनी कमी केली आहे. तर, डॉली खन्ना यांनीही नोसिल आणि रेन इंडस्ट्रीज यामधील गुंतवणूक कमी केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here