केंद्र-राज्य सरकारची अळीमिळी; हमीभावाच्या मुद्द्यावर घेतली मुग गिळ्याची भूमिका, पहा व्हिडिओ

हमीभाव एकदा जाहीर करून टाकले की केंद्र सरकार नामानिराळे होते. तर, शेतकऱ्यांच्या मुद्यावर आपले काहीच कर्तव्य नसल्याचे समजून राज्य सरकार गप्प राहते. वर्षानुवर्षे हीच कूप्रथा भारतात कायम आहे. यंदाही त्यात विशेष बदल झालाय असे नाही. उलट यंदा तर परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

टीव्ही आणि सोशल मिडीयामध्ये वाचकांना काय दाखवायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य संबंधितांना आहे. त्यामुळे वाचकांची अभिरुची आणि त्याची गरज यांची सांगड न घालता फ़क़्त त्यांना आवडणारे किंवा चघळायला बरे वाटणारे विषय या दोन्ही ठिकाणाहून प्रसिद्ध केले जातात. त्यातले त्यात प्रिंटमध्ये जरा बरी परिस्थिती आहे. मात्र, तरीही शेतीचा मुद्दा ना माध्यम संस्था हिरीरीने लावतात, ना वाचक त्यासाठी आग्रह धरतात. आताही करोना विषाणूचे संकट आणि इतर आर्थिक संकटाशी शेतकरी हिरीरीने लढत असताना हमीभाव काही मुगासह कोणत्याच पिकाला मिळत नसल्याचे विदारक चित्र कायम आहे.

केंद्र सरकारने मुगाला ७ हजार १९६ इतका दमदार हमीभाव जाहीर करून टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हे हमीभाव जाहीर केल्यावर मग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये उधळून आपणच कसे शेतकरी हिताचे रक्षण करतो असे भासवण्याचा प्रयत्नही केला. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आपणच शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचे म्हटले. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही सरकारांनी शेतकऱ्यांच्या मुद्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून टाकले आहे. सध्या बाजारात मुगाला ५ हजार ५०० असा सरासरी भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा दोनेक हजार रुपये क्विंटल कमी भावाने मुगाची राजरोस खरेदी सुरू असताना सरकार मुग गिळ्याची भूमिका भूमिका घेऊन बसलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाला मिळणारा भाव पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून व्हीडीओ पहा. आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना माहितीसाठी शेअर करा.

+++++

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here