‘ही’ कंपनी देणार जिओ फायबरला जोरदार टक्कर; पहा ग्राहकांना काय मिळणार आहे ते

टेलिकॉम सेक्टरमध्ये बादशाह बनू इच्छिणाऱ्या सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ सेवेला टक्कर देण्यासाठी एकेकाळी सुप्रसिद्ध असलेल्या एअरटेलने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. अंबानींच्या मोनोपॉलीला आव्हान देताना ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या बेस्ट स्कीम्स सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने आणल्या आहेत.

जिओ फायबर याचीच चर्चा बाजारात सगळीकडे आहे. सर्वांना भरपूर इंटरनेट देण्याच्या तयारीला लागलेल्या या कंपनीने आता बाजारात एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी केली आहे. मात्र, त्याचवेळी जगण्याची अंतिम लढाई आता करावी लागत असल्याने एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांनीही तगण्याची तयारी केली आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासह नवे ग्राहक जोडण्यासाठी आता अनलिमिटेड प्लॅन आणले आहेत.

कृषीरंगची भूमिका

Airtel Xstream Fiber ही एअरटेल कंपनीची ब्रॉडबॅंड सेवा आहे. त्यांनी 499 रुपयात 40 Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉल्स, एयरटेल Xstream 4K TV Box आणि Xstream 4K TV Box यांचे ओटीटी कंटेंट समाविष्ठ आहेत. अशा पद्धतीने सगळे काही एकाच सेवेमध्ये देण्याची तयारी एअरटेलने केली आहे. 799 रुपये यामध्ये 100 Mbps स्पीड आणि 999 रुपये यामध्ये एंटरटेनमेंटसह 200 Mbps स्पीड 300GB आणि 1,499 रुपये या प्रीमियम प्लानमध्ये 300 Mbps स्पीडसह 500GB डेटा प्रतिमाह अशा स्कीम होत्या. आता मात्र, त्यातच अनलिमिटेड सेवा देण्याची तयारी एअरटेल कंपनीने केली आहे. त्याचवेळी जिओ फायबरची सेवा फ़क़्त 399 पासून सुरू होते. मात्र, त्यामध्ये 3300GB वर कॅपिंग टाकण्यात आलेली आहे.

संपादन : सचिन पाटील

+++++

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here