शेतकऱ्यांना अच्छे दिन : पहा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या FAO ने काय म्हटलेय ते

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गनाइजेशन) अहवालानुसार यंदा भारतीय शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. फूड प्राइस इंडैक्सनुसार यंदा चांगला पाउस आणि एकूण उत्तम हवामानामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ होईल.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

यंदा देशभरात मॉन्सूनचा पाउस खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. पेरणीमध्येही मागील खरिपाच्या तुलनेत तब्बल ७ टक्के वाढ झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नुकतीच मन की बात कार्यक्रमात याची माहिती देताना शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. गहू, सोयाबीन, साखर आणि इतर काही उत्पादनांच्या किमतीत चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. त्यातच आता कांद्याचेही भाव बाजारात वाढत आहेत. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळणार आहेत.

FAO च्या इंडेक्सनुसार इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की, यंदा केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मोदी सरकारने शेतमालाच्या विक्रीचे नियमन काढून टाकून क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. तसेच शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्यासाठीचे प्रयत्न केंद्र सरकारच्या कृषी व अर्थ-व्यापार मंत्रालयाकडून चालू आहेत. त्यातच ऐन करोनाच्या संकट काळातही शेतमालाची निर्यात वाढली आहे. एकूणच सगळीकडे देशातील शेतकऱ्यांना खूप योग्य पद्धतीने बुस्ट मिळत असाल्याचे हे द्योतक आहे.

त्यामुळेच पुढील काळात देशातील शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने भले होण्याची शक्यता आहे. मात्र, आता एखाद्या शेतमालाचे भाव वाढले की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी त्यात जुन्या पद्धतीने खोडा घालू नये याकडेच शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here