धक्कादायक : BSNL मधील ‘त्या’ २० हजारांच्या जाणार नोकऱ्या; ऐन मंदीत होणार बेरोजगार..!

सध्या देशाची अर्थव्यवस्था करोनाच्या निमित्ताने एकदम रसातळाला गेली आहे. नोटबंदी आणि जीएसटीचा फटका बसलेली भारतीय अर्थव्यवस्था त्यामुळे जगभरात सर्वाधिक खोलात आहे. अशावेळी काही खासगी कंपन्या जोमात आहेत. तर, सर्वकाही असूनही BSNL (बीएसएनएल) सारख्या दिग्गज कंपन्या सरकारी धोरण आणि कर्मचाऱ्यांच्या बोगस कार्यपद्धतीमुळे पूर्ण गाळात गेलेल्या आहेत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

याच BSNL ने आता आपल्याकडील किमान २० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करून अगोदरच या कंपनीने लाखो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. मात्र, त्या निर्णयाने कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली आहे. अशावेळी कंपनीला आर्थिक गर्तेत लोटणाऱ्या प्रशासकीय धुरींनानी आणखी २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवण्याची तयारी केली आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयाला कर्मचारी संघटनांचाही पाठींबा आहे. भारत संचार निगम लिमिटेड ही एकेकाळी देशातील दिग्गज कंपनी होती. अजूनही देशभरात या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात आॅप्टिकल फायबरचे जाळे आणि मुख्य ठिकाणी जागा आहेत. त्याच ताब्यात घेण्यसाठी काही खासगी कंपन्या वाट पाहून आहेत. त्यातच सगळे काही स्वतःकडे असूनही या कंपनीने इतरांना आउटसोर्स करून मोठे केले. आता त्या कंपन्या टेलिकॉम सेक्टरमध्ये दिग्गज बनल्या आहेत.

तर, BSNL ची आणखी वाताहत होते की काय अशी परिस्थिती आहे. यातच या कंपनीने कर्मचारी काढून टाकून लाखोंना बेरोजगारीचे बक्षीस दिले आहे. अशावेळी या कंपनीचे भवितव्य काय असेल आणि भविष्यात तिचा मालक कोण असेल हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाहीच की..!

संपादन : विनोद सूर्यवंशी

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here