धक्कादायक : WHO ने कोविड १९ च्या लसबाबत केला ‘हा’ खुलासा; वाचा महत्वाची न्यूज

मागील सहा महिन्यांपासून अवघ्या जगभरात कोट्यवधी कुटुंबियांना संकटात टाकणाऱ्या आणि थांबण्याचे काहीच नाव घेत नसलेल्या करोना विषाणूचे संकट आणखी गडद होत आहे. यावर लस किंवा औषध कधी येणार याचीच सार्वजन आतुरतेने वाट पाहत आहेत. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती देऊन आणखी गोंधळ उडवला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

होय, WHO ने याबाबतची माहिती देताना अशी लस लवकरच येण्याच्या माहिती व बातम्यांचा समाचार घेतला आहे. त्यांचे प्रवक्ते मार्गारेट हरीस यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, सध्या जगभरात अनेक सरकारी व खासगी संस्था कोविड १९ यावरील लस बनवत आहेत. संशोधक यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. मात्र, एकूण लस शोधणे, त्याच्या चाचण्या घेणे, मग योग्य असल्यास उत्पादन करून सर्वांना देणे ही मोठी वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे याची लस लगेचच येईल असे नाही.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, २०२० मध्ये लस येईल अशी खात्री वाटत नाही. २०२१ च्या मध्यात म्हाणजे एप्रिल महिन्याच्या नंतर लस येईल असेच सध्यातरी वाटते. आतापर्यंत ज्या कोणत्या कंपन्या व संस्था यांच्या लसचे निष्कर्ष हाती आलेले आहेत. त्यापैकी एकाचीही ल्स किमान ५० टक्के तरी प्रभावी आहे असे दिसलेले नाही. एकूणच यामुळे ही प्रक्रिया आणखी वेळखाऊ बनणार आहे.

लस शोधण्याच्या चाचण्यांचा तिसरा टप्पा जास्त वेळखाऊ असतो. अशावेळी तरीही रशियाने आपली लस जाहीर करून टाकली आहे. तर अमेरिकेने अध्यक्षीय निवडणुकीच्या अगोदरच लस देण्यासाठीचे नियोजन करून टाकलेले आहे. एकूणच जगभारत सगळे काही फ़क़्त मतदानाच्या तारखांवर अवलंबून केले जात असल्याची यामुळे शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेवर अनेकांना अविश्वास वाटत आहे. ही संघटना युरोपात आहे, तिथे भारताची मंडळी आणि अमेरिकन व युरोपियन मंडळी प्रमुख पदावर असतानाही ही संघटना चीनची दास बनल्याची टीका होत आहे. एकूणच आरोग्याचा सावळागोंधळ जगभरात चालू आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here