तरीही मोडला नव्हता कणा; वाचा शेतकरी क्रांती’ज्योती’च्या जिद्दीची गोष्ट

महिलांची ताकद आणि सामाजिकदृष्ट्या असलेले महत्व लक्षात घेऊन महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. सावित्रीबाई यांना शिकवून त्यांनी महिनांना शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यांची दूरदृष्टी देशाच्या विकासासाठी खूप महत्वाची ठरली. त्यालाच अधोरेखित करण्याचे काम अकोला जिल्ह्यातील ज्योती देशमुख यांनी करून दाखवले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

बीबीसी मराठी आणि हिंदी यांनी याची एक स्टोरी व्हिडिओ स्वरूपात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या त्या व्हिडिओला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठीच्या व्हीडीओला लाखो लाईक भेटल्याने आता बीबीसीने हा व्हीडीओ हिंदीत बनवला आहे. तिकडेही हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यात ज्योतीताई सांगतात की, पती, सासरे आणि दीर यांनी आत्महत्या केल्यावर आम्हाला मोठा धक्का बसला. मात्र, त्यावेळी समाजाने शेती न करता विकण्याचा सल्ला दिला. मात्र, आम्ही शेती कसली आणि त्यातून अर्थार्जनही होत आहे.

ज्योती यांनी स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करून शेती कसण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आम्हाला कोणीही वेळेवर ट्रॅक्टर दिला नाही. रात्रीच्या वेळेला आमच्या शेतात ट्रॅक्टर यायचा. मग मीच स्वतःचा ट्रॅक्टर घेण्याचे ठरवले. शेती करताना इतरांनी काहीही नावे ठेवली. पण तिकडे लक्ष न देता शेतात माक केले. आता मी २९ एकर शेती करीत आहेत.

मुलगा पुण्यात आयटी कंपनीत कामाला आहे. तर, मी शेती करीत आहे. बोअरवेल घेण्यासह मी घराची डागडुजी केली आहे. आम्ही आता आनंदाने राहतो. शेतीत आम्ही काम करून ती फुलवली आहे. यापुएधी असेच काम करीत राहणार आहे, असेही ज्योतीताई यांनी त्यात म्हटले आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here