जपानचीही चीन्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; पहा काय निर्णय घेतलाय जापानी सरकारने ते

भारतासह जपानचाही शेजारी असलेल्या मुजोर चीनचा ‘नक्षा उतारने के लिये’ आता सगळेच एक होत आहेत. जपान सरकारने चीनमधील त्यांच्या कंपन्यांचे कारखाने व ऑफिसेस भारतात नेणाऱ्या कंपन्यांना अनुदान देण्याची तयारी केली आहे. एका अर्थाने जपानचाही चीनवर हा सर्जिकल स्ट्राईक आहे.

एनएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती प्रसिद्ध करणात म्हटले आहे की, चीनमध्ये नाही तर आशियामधील इतर देशांमध्ये जी कोणतीही कंपनी उत्पादन करेल त्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्यामध्ये भारत आणि बांगलादेश या दोन देशांना विशेष महत्वाचे स्थान असणार आहे. येथील लोकसंख्या आणि कुशल मनुष्यबळ यामुळे या दोन्ही देशात यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

चीनच्या बाहेर आपले उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी जपानने २२१ मिलियन डॉलर अर्थात १ हजार ६१५ कोटी रुपये इतके वेगळे अनुदान ठेवले आहे. अनेक कंपन्या या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणजेच भारतात पुढील काळात अनेक जपानी कंपन्या रोजगार देतील असे वाटते.

जपानच्या अर्थव्यवस्था, व्यापार और उद्योग मंत्रालय (एमईटीआई) यांनी याची घोषणा केली आहे. करोनाची जागतिक महामारीसाठी चीनला जबाबदार धरले जात आहे. मुजोर चीनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार करीत आहेत. मात्र, एकूणच चीनी सरकार, त्यांचे लष्कर आणि प्रशासन यांच्यामधील बेजबाबदार घटकांमुळे जगभरात चीनच्या अडचणीत वाढ होत आहे. एका अर्थाने हा भारतासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल. करा, भारताची खड्ड्यात जात असलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी याचा भविष्यात उपयोग होईल.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here