चीनबरोबरच्या बैठकीत काय झाले ‘ते’ वाचा; २.२० तास चालली रशियात बैठक..!

लडाखमधील सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या चीन-भारत यांच्यामध्ये असलेला संवाद मागे पडला आहे चीनच्या आडमुठ्या धोरणामुळे हे घडले आहे. मात्र, आता भारताने कडक धोरण अवलंबल्याने चीनने नारामाईचे धोरण ठेवले आहे. यानुसार मॉस्कोमध्ये चीनच्या विनंतीवरून शुक्रवारी रात्री भारतीय शिष्टमंडळाने एका बैठकीत चर्चा केली.

त्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कठोर शब्दांमध्ये भारताची भूमिका चिन्यांना सांगितली आहे. नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने असे म्हटले आहे. सिंग यांच्यासह या बैठकीत संरक्षण सचिन अजय कुमार आणि राजदूत डी. बी. व्यंकटेश हेही सहभागी झालेले होते. तर, चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री वेई फेंग यांनी केले.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मॉस्को येथे शुक्रवारी रात्री ९ वाजता बैठकीला सुरुवात झाली. मग २ तास आणि २० मिनिटे इतका वेळ ही बैठक चालली. या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि कोणता तोडगा निघाला हे संरक्षण मंत्रालयाने किंवा भारत सरकारने स्पष्ट केलेले नाही. मात्र, एकूणच या बैठकीत भारत गरम, तर चीन नरम असेच चित्र असल्याचे समजते.

  शंघाई सहयोग संगठन (एससीओ) यांच्या सदस्य देशांमधील संरक्षण मंत्र्यांच्या शिखर बैठकीला सध्या सिंग रशियात गेले आहेत. त्यावेळी चीन्यांनी बैठकीची वेळ मागवून घेतल्याने मग ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पैंगोंग झील भागातील तणावामुळे दोन्ही देशांचे संबंध आता पुन्हा एकदा बिघडलेले आहेत. त्यातच भारत सरकारने चीनच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर बंदी घालून चीनी कंपन्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे त्यामुळे चीनचे धाबे दणाणले असल्याचे हिंदी व इंग्रजी माध्यमांनी म्हटले आहे.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here