रशियापेक्षा जगाचा ‘हा’ मोठा शत्रू आहे; पहा काय म्हटलेय डोनाल्ड ट्रम्प यांनी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजे मुद्दे कमी आणि भावनिकदृष्ट्या योग्य साद घालून निवडणूक जिंकणारे जागतिक महामेरू आहेत. यंदा त्यांनी रशिया नाही, तर चीन हाच जगातील सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर ते स्वतः निवडून आले नाहीत तर जगभरात चीन आणखी मुजोर होईल.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

एकूणच मागच्या निवडणुकीत रशियाचा मुद्दा पुढे करून निवडून आलेले ट्रम्प यंदा चीनवर घसरले आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत नंतर प्रतिस्पर्धी उमेदवार हिलेरी क्लिंटन यांना हरवण्यासाठी रशियन सायबर माफियांनी ट्रम्प यांनाच मदत केल्याचे स्पष्ट झाले होते. आता तेच ट्रम्प चीनवर आगपाखड करीत आहेत. त्यातच त्यांचे जुने शिलेदार ट्रम्प यांनी चीनसोबत निवडणूक जिंकण्यासाठीचा करार केल्याचे सांगत आहेत.

अशा पद्धतीने केऊनच अम्रीकन निवडणुकीत मुजोर चीन हाच केंद्रबिंदू बनला आहे. ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य करतानाच भारताचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. भारतीय अमेरिकन मतदारांना भुलवण्यासाठी त्यांनी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले मित्रत्व आणि भावनिक साद यांची सांगड घातली आहे. जर प्रतिस्पर्धी उमेदवार जिंकला तर तो चीनचाविजय असल्याचेही ट्रम्प यांनी भारतीय स्टाईलने ठोकून दिले आहे. भारताला सर्वोतोपरी मदत करण्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले आहे.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here